शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उरवडे येथील अग्नितांडव प्रकरणी कंपनी मालक निकुंज शहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 15:40 IST

उरवडे येथील सव्हीए अ‍ॅक्वा कंपनीत आगीची भीषण आगीची घटना सोमवारी घडली. त्यात 18 निरपराध जणांना त्यांचा जीव गमवावा लागला.

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एसव्हीएस कंपनीचा मालक निकुंज शहा (रा. सहकारनगर) याच्यावर पौड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शहा याला मंगळवारी( दि.८) अटक केली. बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर शहा याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एस. बी गणपा यांनी हा आदेश दिला आहे.

निकुंज शहा ( वय ३९ रा. सहकारनगर) असे मालकाचे नाव आहे. त्यांच्यासह याप्रकरणी बिपीन शहा( वय ६८ रा .सहकारनगर) , केयुर बिपीन शहा ( वय ४१, मूळ रा सहकारनगर, रा . दुबई) आणखी दोन जणांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.

सोमवारी (दि .८ जून) एसव्हीए अ‍ॅक्वा कंपनीला आग लागून त्यात १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि ५ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेप्रकरणी सुरक्षिततेच्या नियनाचे पालन न केल्यास तसेच अनाधिकृत सॅनिटायझरचा बेकायदा साठा केल्याने आग लागू शकते व त्यात कामगारांचा जीव जाऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.

कंपनीच्या मालकाला न्यायालयात बुधवारी हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील निलेश लडकत यांनी युक्तिवाद करताना हा गुन्हा भीर स्वरूपाचा असून, या प्रकरणातील अन्य दोन आरोपीला अटक करायचे असल्याने आणि पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. आरोपीच्या बाजूने ऍड हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.....

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मृतांच्या कुटुंबियांची मागणी..

उरवडे येथील एसव्हीए अ‍ॅक्वा कंपनीला केवळ क्लोरोक्नीनच्या गोळ्यांच्या पँकिंगची आणि पावडर तयार करण्याची परवानगी होती. फक्त याचाच परवाना असताना सॅनिटायझर प्लॅस्टिक बॉटलमध्ये भरण्याचे काम मालकाने या ठिकाणी सुरू केले होते. हे अतिशय धोकादायक रसायन असल्यामुळेच या ठिकाणी ही आगीची भीषण घटना मोठी घटना  सोमवारी घडली. त्यात १८ निरपराध जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. याप्रकरणी कंपनी मालक निकुंज शहा याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली होती.

चौकशी समितीने दिला अहवाल....

याप्रकरणी स्थापन केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षेतखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांनी घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. या अहवालात परवानगीपेक्षा अधिक ज्वालाग्रही पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणावर केला होता. त्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. ज्वालाग्रही कच्चा माल साठवणुकीचे ठिकाण व काम करण्याच्या जागा एकच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रसायनांनी पेट घेऊन स्फोट झाला व आग नियंत्रणाच्या बाहेर गेली. समितीच्या अहवालानंतर ग्रामीण पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन निकुंज शहा याला अटक केली आहे. समितीच्या अहवालात १२ मुद्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयfireआगPoliceपोलिसDeathमृत्यूEmployeeकर्मचारी