दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 09:48 PM2020-09-02T21:48:50+5:302020-09-02T21:49:22+5:30

पुणे शहरात बुधवारी १६२७ नवीन कोरोना रुग्ण, ४३ रुग्णांचा मृत्यू

Comfortable! The number of those who defeated Corona crossed 80,000; 1408 patients were cured during the day | दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

Next
ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०४० जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजारांच्या पार गेली आहे. मंगळवारी दिवसभरात १६२७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १४०८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १०४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४२३ झाली आहे. 

विविध रुग्णालयातील १०४० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ४२३ झाली आहे. 
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आहे. यातील ५३० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ४३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ४३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३७५ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४०८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८० हजार ८९७ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १५ हजार ४२३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २१५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ६४ हजार २१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: Comfortable! The number of those who defeated Corona crossed 80,000; 1408 patients were cured during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.