शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आओ जाओ घर तुम्हारा : पुणे रेल्वे प्रशासन सुस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 11:28 AM

पिस्तुल किंवा अन्य शस्त्रास्त्रे घेऊन रेल्वे स्थानकातून कोणालाही ये-जा करता येत असल्याचे भरगर्दीत पोलीस निरीक्षकावर गोळीबार झाल्यानंतर स्पष्ट झाले.

ठळक मुद्देमेटल डिटेक्टर, स्कॅनर बंद, अधिकाऱ्यांची स्थिती  रेल्वे स्थानकात तब्बल ३० ठिकाणांहून प्रवेश करता येतो. सध्या फलाट क्रमांक एकवर प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन मेटल डिटेक्टर दिसतात

पुणे : भरगर्दीत पोलिस निरीक्षकावर गोळीबार झाल्यानंतर पुणेरेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. तसे येथून प्रवास करणाऱ्या माणसाच्या मनात भीती आहे. पिस्तुल किंवा अन्य शस्त्रास्त्रे घेऊन स्थानकातून कोणालाही ये-जा करता येत असल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकात तब्बल ३० ठिकाणांहून प्रवेश करता येतो. तर सध्या स्थानकात असलेले दोन मेटल डिटेक्टर आणि एक स्कॅनर मागील काही दिवसांपासून बंद आहेत. घटनेच्या दोन दिवसांनंतर शुक्रवारीही रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचे दिसून आले.    वडगावशेरीतील एका महिलेचा खून केल्यानंतर आरोपी पुणे रेल्वे स्थानकातून झेलम एक्स्प्रेसने दिल्ली येथे पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जात असताना त्यांना पोलीस पकडण्यासाठी गेले असताना शिवलाल राव याने गोळीबार करुन पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना जखमी केले व ते पळून गेले होते. हा थरार बुधवारी सायंकाळी रेल्वे स्थानकातच भर गर्दीच्या वेळी घडल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी दोघाही आरोपींना जेरबंद केले. मात्र, या प्रकारामुळे रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हे करताना सुरक्षेबाबत मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. सध्या फलाट क्रमांक एकवर प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन मेटल डिटेक्टर दिसतात. तसेच एक स्कॅनरही अनेक वर्षांपासून आहे. पण सध्यातरी दोन्ही उपकरणे बंद असल्याने केवळ बुजगावणे ठरत आहेत. मेटल डिटेक्टर सुरू असतानाही त्याचा उपयोग होत नाही. ज्याठिकाणी डिटेक्टर बसविण्यात आले आहेत, त्याच्या आजू-बाजूनेही प्रवाशांना आत जाता येते. तर केवळ एकच स्कॅनर असल्याने तिथेही सर्व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करणे अशक्यप्राय आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी तब्बल ३० ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणी स्कॅनर किंवा मेटल डिटेक्टर बसविणे शक्य नाही. फलाट क्रमांक एक तसेच अन्य फलाटांवर जाण्यासाठी इतर मार्गांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षाविषयक काळजी घेतली जात नाही. कोणीही प्रवासी कोणतीही वस्तु किंवा शस्त्रास्त्रे घेऊन स्थानकातून प्रवेश करू शकतो. पोलिसांकडूनही तपासणी केली जात नसल्याचे प्रवाशांनी सांगितले................पोलिस निरीक्षकावर स्थानकात गोळीबार झाल्यानंतरही रेल्वे प्रशासन सुस्त असल्याचे शुक्रवार दिसून आले. बंद मेटल डिटेक्टर व स्कॅनर सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. दोन्ही उपकरणे शुक्रवारी जागेवर बंद अवस्थेत उभी होती. स्कॅनर शेजारी दोन-तीन पोलिस बसलेले दिसून आले. बॅरीकेट्स लावून स्कॅनरलाच सुरक्षा पुरविण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतर प्रवेशद्वारांवरही पोलिसांची गस्त किंवा इतर उपाययोजना दिसून आल्या नाहीत. याबाबत अधिकारीही बोलण्यास तयार नाहीत. रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहे. प्रवाशांची तपासणी होत नाही. सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत रेल्वे प्रशासन कमी पडत आहे. स्कॅनरचा फक्त दिखाऊपणा आहे.- श्रीकांत जाधव, प्रवासी....................स्थानकात जिथे स्कॅनर किंवा मेटल डिटेक्टर आहेत, तिथे पोलिस लक्ष देत नाहीत. प्रवासी त्याच्या बाजून सामान घेऊन जात असतात. त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही.- दिनेश नाईक, प्रवासी

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी