बारामतीत डंपरने महाविद्यालयीन युवकाला चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 20:04 IST2025-01-24T20:03:59+5:302025-01-24T20:04:07+5:30
बारामतीच्या तांदूळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डंपरने विद्यार्थ्याला चिरडले

बारामतीत डंपरने महाविद्यालयीन युवकाला चिरडले
बारामती : बारामती शहरात डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात परीक्षा देऊन घरी निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे घटनेप्रकरणी ग्रामस्थ आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,जुनेद झारी असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. जुनेद बारामती मधील टीसी कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. तांदूळवाडी बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात झाला. शुक्रवारी (दि २४) दुपारी बारामतीच्या तांदूळवाडी भागातील रोडवर एका चारचाकी हायवा डंपरने या विद्यार्थ्याला चिरडले. या अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
बारामती शहरात डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात झाला. परीक्षा देऊन घरी निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. #Accidentpic.twitter.com/jmVXIGRY6u
— Lokmat (@lokmat) January 24, 2025
तो बारामती तालुक्यातील तांदूळवाडी गावचा असल्याची माहिती मिळते आहे. महाविद्यालयातून घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांनी डंपर आणि डंपर चालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील महाविद्यालयातून पेपर संपल्यानंतर जुनेद झारी आपला मित्र तुषार सोबत एका दुचाकीवरून घरी निघाला होता. जुनेद स्वतः दुचाकी चालवत होता, तर मित्र तुषार पाठीमागे बसला होता.