शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

ग्रीन पुण्यासाठी सीएनजी जनजागृती दौड   

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 6:09 PM

दिवसागणिक पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

पुणे - दिवसागणिक पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे.  दिल्लीमध्ये प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून तशीच वेळ पुण्यावर येऊ नये याकरीता पुण्यातील दुचाकीस्वारांनी सीएनजी कीट बसवून प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी योगदान द्यावे, यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात आले. तब्बल १० किलोमीटर धावून ग्रीन सिटी चा संदेश यावेळी देण्यात आला. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून पुणे रनिंग बियाँड मायसेल्फ मॅरेथॉनमध्ये सीएनजी जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅसचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद तांबेकर, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, आॅपरेशन आणि देखभाल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक मिलिंद नरहर शेट्टीवार, मिलिंद ढकुले आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र नॅचरल गॅसचे ६० कर्मचारी अभियानात सहभागी झाले. यावेळी सीएनजी कीट बसविलेल्या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह देखील पुणेकरांनी घेतली. 

संतोष सोनटक्के म्हणाले, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत होणारी वाढ याला सीएनजी (कम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) हा अत्यंत स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे.  केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी वाहने, बसेस यामध्ये देखील सीएनजीचा वापर करता येतो. दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याकरीता  ८५ टक्के वित्तपुरवठा देखील करण्यात येत आहे़

टॅग्स :Puneपुणे