जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:25 IST2025-07-14T13:23:56+5:302025-07-14T13:25:20+5:30
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते

जिवलग नाती तुटतात अन् पुन्हा एकत्र येतात; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया
पुणे : राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले, याचा आनंद आहे. जिवलग नाती तुटतात. पुन्हा परत एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्रित राहणे कधीही चांगले असते. असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांचे स्मृतिप्रीत्यर्थ २०२५ सालाचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार मॉडर्न महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
अमृता फडणवीस म्हणाल्या, महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना दुःखदायी आहे. शहरात, गावात स्त्रियांवर अत्याचार होत आहे. यावर राज्यकर्ते, पोलिस, न्यायालय यांना एकत्रित काम करावे. महिलांना सन्मान देणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहील. बजेटवर भार पडला तरी बहिणीसाठी ते सहन करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यात आध्यात्मिक परंपरा आणि सामाजिक सुधारणा यांचा मेळ आहे. त्यामुळे पुण्यात येऊन फार आनंद होतो. पुण्यातील प्रकृती आणि लोक याबद्दल आपुलकी वाटते. इथे काय आणखी सुधारणा करता येतील, हे मी देवेंद्रजींना सांगत असते. ते देखील पुण्याकडे लक्ष देतात.
गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा
दत्तमंदिरात तब्बल १२८ वर्षांपासून प्रत्येक जण श्रद्धा व सेवेसाठी येतो. खरी मानवता काय आहे, हे विश्वस्तांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे. गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा व्हावा, यामध्ये लोकमान्य टिळकांच्या पाठीमागे लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांचा हातभार होता. लक्ष्मीबाई या शांतपणे परिवर्तन घडवून आणत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.