पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी; घटना CCTV मध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:33 IST2022-11-15T11:31:22+5:302022-11-15T11:33:47+5:30

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली घटना

Clash between two groups in Pune's Budhwar Peth; The incident was captured on CCTV | पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी; घटना CCTV मध्ये कैद

पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी; घटना CCTV मध्ये कैद

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. पण अजूनही पोलिसात या घटनेची नोंद झालेली नाही.

सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहे. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली. या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Clash between two groups in Pune's Budhwar Peth; The incident was captured on CCTV