शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शहराला आता दिवसाआड पाणी

By admin | Updated: July 14, 2014 04:52 IST

धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घेणे अपरिहार्य बनले आहे.

पिंपरी : धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घेणे अपरिहार्य बनले आहे. पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही आता दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. सोमवारी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घ्यावा, असे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना सांगितले.जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहरअभियंता महावीर कांबळे, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, लियाकत पीरजादे आदी उपस्थित होते. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पावसाने दडी मारली आहे. धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पवना धरणात केवळ १३ टक्केच पाणीसाठा आहे. धरणातील पाणी पिंपरी चिंचवड शहराला पुरविण्यात येते. काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने काटकसरीने पाणी वापरण्याचे धोरण अवलंबणे अनिवार्य बनले आहे. पावसाचे दोनच महिने उरले आहेत. त्या कालावधीत पुरेसा पाऊस होईलच हे सांगता येत नाही. भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. ही बाब गांभीर्याने घेऊन नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील काळातील पाण्याचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय मर्यादित काळासाठी न ठेवता कायम अंमलबजावणी करावी लागणार आहे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.(प्रतिनिधी)