सरकारी यंत्रणेसह नागरिकांचे दुर्लक्ष

By Admin | Updated: June 12, 2014 05:14 IST2014-06-12T05:14:22+5:302014-06-12T05:14:22+5:30

सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सरकारी यंत्रणेतील उदासीनतेमुळे बालकांकडून सक्तीने श्रम करून घेतले जाते.

Citizens ignore government machinery | सरकारी यंत्रणेसह नागरिकांचे दुर्लक्ष

सरकारी यंत्रणेसह नागरिकांचे दुर्लक्ष

मिलिंद कांबळे , पिंपरी :
सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सरकारी यंत्रणेतील उदासीनतेमुळे बालकांकडून सक्तीने श्रम करून घेतले जाते. कोवळ्या जिवाकडून एखाद्या जनावराप्रमाणे दिवसभर राबवून घेतले जाते. बालकामगार आजही विविध ठिकाणी राबताना दिसत आहेत. या अनिष्ट प्रथेस रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरात आणि खेड्यात लहान मुलांकडून अनेक कामे करून घेतली जातात. बाल कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुले व मुली हे बालकामगार गटात मोडतात. तर, १४ ते १८ वयोगटांतील किशोर कामगार म्हणून ओळखले जातात.

Web Title: Citizens ignore government machinery