शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Update: रेनकोट - छत्री सोबत ठेवा; पुढील ३ तासात राज्यात पावसाचा अंदाज; अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

By श्रीकिशन काळे | Updated: July 19, 2024 15:39 IST

सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार

पुणे: राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरवात झाली असून, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज (दि.१९) जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये आणि घाटमाथ्यावर मात्र रेड अलर्ट देण्यात आला आहे. लोणावळ्यात २४ तासांत १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक कोल्हापूर भागातील धरणक्षेत्रात ३०० मिमी पाऊस झाला. 

 सध्या बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. आज शुक्रवारी (दि.१९) कोकण, घाटमाथा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकणातील रत्नागिरी, सातारा, विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा 'रेड' अलर्ट आहे. 

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुणा, मंडला, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत तो पट्टा सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांना जोडणारे क्षेत्र देखील सक्रिय आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे.  पुढील ३-४ तासांमध्ये राज्यातील मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, पुणे घाट माथ्यावर मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. लोणावळामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३५ मिमी पावसाची नोंद झाली. ताम्हिणी घाटात १६८ मिमी, तर डुंगुरवाडीमध्ये १३३ मिमी पाऊस झाला. धरणक्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस होत आहे. कोयनामध्ये ११४ मिमी, राधानगरी १६३ मिमी, कासारी१०५ मिमी, पाटगाव ३०० मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीDamधरणNatureनिसर्गenvironmentपर्यावरण