गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 14:43 IST2021-01-02T14:43:14+5:302021-01-02T14:43:38+5:30

सराईत गुन्हेगाराचे कृत्य

Cigarettes hit the young man on the forehead for not giving him a ride; Incident at Wadgaon Budruk | गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना

गाडीची राईड न दिल्याने तरुणाला दिला सिगारेटने कपाळावर चटका; वडगाव बुद्रुक येथील घटना

पुणे : गाडीची राईड न दिल्याने सराईत गुन्हेगाराने तरुणाच्या कपाळावर सिगारेटने चटका देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. योगेश देवीदास कांबळे (वय २३) आणि आश्विन भोसले (दोघे रा़ हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सुहास अभिमन्यू वाघमारे (वय १९, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. योगेश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सुहास वाघमारे व त्याचा मित्र योगेश निर्मळ हे मोटारसायकलवरुन शुक्रवारी सकाळी जात होते. त्यावेळी वडगाव येथील रोकडोबा मंदिर येथे योगेश कांबळे याने त्यांना हाक मारुन थांबविले व गाडीच राईड मागितली. तेव्हा वाघमारे याने गाडी देण्यास नकार दिला. तेव्हा योगेश व आश्विन यांनी त्याला शिवीगाळ केली़ योगेश् याने सिगारेट पेटवून ती वाघमारे यांच्या कपाळावर चटका देऊन जखमी केले. पोलिसात गेला तर याद राखा अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कर्चे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Cigarettes hit the young man on the forehead for not giving him a ride; Incident at Wadgaon Budruk