पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानअपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची गुरुवारी चौकशी करण्यात आली. अजित पवार यांचा बारामतीतविमानअपघातात मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाला. विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलिस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर वैमानिक, तसेच वैमानिकाचा हलगर्जीपणा किंवा घातपात असा संशय व्यक्त केला असताना आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन विमान कंंपनीवर गंभीर आरोप केले होते. डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन), तसेच एएआयबी (एअरक्राफ्ट ॲक्सिडेन्ट इन्व्हीस्टीगेशन ब्युरो) यांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ५) व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. व्ही. के. सिंग हे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित यांच्यासह सीआयडीच्या पाषाण रस्त्यावरील कार्यालयात आले. ‘विमानाची ऑपरेशन प्रक्रिया, मेंटेनन्स रेकॉर्ड, तांत्रिक बाबी, सुरक्षा नियमांचे पालन, अपघाताशी संबंधित अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली’, अशी माहिती सीआयडीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
Web Summary : CID investigated VSR company director V.K. Singh regarding Ajit Pawar's plane crash that killed Pawar and others. Rohit Pawar alleged company negligence. The inquiry covered operational procedures, maintenance, and safety compliance.
Web Summary : सीआईडी ने अजित पवार के विमान दुर्घटना मामले में वीएसआर कंपनी के निदेशक वी.के. सिंह से पूछताछ की, जिसमें पवार और अन्य की मौत हो गई। रोहित पवार ने कंपनी पर लापरवाही का आरोप लगाया। जांच में परिचालन प्रक्रियाएं, रखरखाव और सुरक्षा अनुपालन शामिल थे।