रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 13:37 IST2018-01-03T13:36:11+5:302018-01-03T13:37:51+5:30
एकीकडे सर्व अप्परचे चौक बंद केल्यामुळे, दुकाने बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. तर दुसरीकडे कोणत्याही समस्येची जाणिव नसलेली निरागस मुले मात्र खेळण्यात मग्न होती.

रस्त्याचा ताबा घेतला बच्चेकंपनीने; पुण्यातील अप्परमध्ये सुट्टीचा मौका साधत खेळण्यात मग्न
बिववेवाडी : एकीकडे सर्व अप्परचे चौक बंद केल्यामुळे, दुकाने बंद असल्याने नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. तर दुसरीकडे कोणत्याही समस्येची जाणिव नसलेली निरागस मुले मात्र खेळण्यात मग्न होती.
शहरात काय चालले आहे, याचा या निरागस मुलांना सुगावाही नव्हता. जात-पात, मतभेद हे सगळे विसरून ही मुले रस्त्यावर खेळत होती. अप्पर परिसरात हे चित्र पहायला मिळाले.