कालवा फुटीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:44 PM2018-10-02T14:44:52+5:302018-10-02T14:52:24+5:30

कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. या परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़.

Chief Minister felicitates the two police, who save the lives of the citizens in the Kalwa accident | कालवा फुटीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 

कालवा फुटीत नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 

Next
ठळक मुद्देलोहगाव विमानतळावर शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन दोघांचा गौरव

पुणे : मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड आणि संतोष लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी लोहगाव विमानतळावर सत्कार करण्यात आला़. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी उपस्थित होते़. 
कालवा फुटल्यानंतर जनता वसाहतीत पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले़. या पाण्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने अडकले होते़. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस काँस्टेबल गायकवाड यांनी याही परिस्थिती स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहात जात दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना बाहेर काढले़. जखमी असलेल्या एका लहान मुलाला पाठीवर घेऊन सुरक्षित ठिकाणी आणले़. सूर्यवंशी यांनी तीन लहान मुले व त्यांच्या मातांना पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले़. त्यांच्या या धाडसाने सर्वांनीच कौतुक केले होते़. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते़. त्यावेळी लोहगाव विमानतळावर त्यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन या दोघांचा गौरव करण्यात आला़.

Web Title: Chief Minister felicitates the two police, who save the lives of the citizens in the Kalwa accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.