गेल्या वेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जिंकू; बारामतीत कमळ फुलवू- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:34 IST2019-02-09T14:23:01+5:302019-02-09T14:34:11+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे 48 जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी 43 वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. बारामतीमध्येही कमळ असणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गेल्या वेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जिंकू; बारामतीत कमळ फुलवू- मुख्यमंत्री
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे 48 जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी 43 वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. बारामतीमध्येही कमळ असणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमूख उपस्थितीत पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांचे संमेलन झाले.. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामती मधील जागा गेली. कमळ चिन्ह नव्हते. आता तसे होणार नाही. कमळच असेल. फक्त बारामतीच नाही तर शिरुर आणि मावळ मधील जागाही भाजप जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, 2019 ची निवडणूक काही जणांसाठी पक्ष टिकवण्याची आहे. काही जण मुलांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपासाठी मात्र ही निवडणूक देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.