शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

चतु:शृंगी दरोड्यातील दोघांना अटक, तीन आठवड्यांत केली अटक, आणखी सहा जणांचा शोध सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:30 IST

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअर कंपनीतील चालकासह तिघांचे अपहरण करून, ३१ लाख रुपयांची रोकड लुटणाºया गुजरातमधील टोळीचा गुन्हे शाखेने अवघ्या तीन आठवड्यांतच छडा लावला. यातील दोघांना युनीट एकच्या पथकाने अटक करून, २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या टोळीने अशा प्रकारे दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या ठिकाणीही दरोडे टाकले आहेत.

पुणे : शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाजवळ पोलीस असल्याची बतावणी करून कुरिअर कंपनीतील चालकासह तिघांचे अपहरण करून, ३१ लाख रुपयांची रोकड लुटणाºया गुजरातमधील टोळीचा गुन्हे शाखेने अवघ्या तीन आठवड्यांतच छडा लावला. यातील दोघांना युनीट एकच्या पथकाने अटक करून, २१ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या टोळीने अशा प्रकारे दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गुजरात या ठिकाणीही दरोडे टाकले आहेत.सूरज ऊर्फ सूर्या कनूभाई राठोड ऊर्फ हालपट्टी (वय ३४, रा. दिव दमन), कमलेश बाबूभाई धोडी (वय २६, रा. जि. वलसाड, गुजरात) या दोघांना अटक केली आहे.टोळीचा म्होरक्या अनिल ऊर्फ मामा रामचंद्र आढाव (वय ४२, दिव दमन), पप्पू यादव ऊर्फ बिहारी , नरेश नट्टू गामित (वय ३८, जि. तापी, गुजरात) याच्यासह अन्य तिघांचाशोध सुरू आहे. मनोज ऊर्फ कांतिलाल धनाजीभाई डेंडोरे (वय ३८, रा. रास्ता पेठ) यांनी यासंदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.डेंडोरे हे राजेश मणिलाल अ‍ॅण्ड कुरिअर कंपनीत वाहनचालक म्हणून नोकरीला आहेत. गेल्या महिन्यात गुरुवारी (दि.२४) पहाटे साडेचार वाजता व्यवस्थापकासह ते ३१ लाखांची रोकड घेऊन मुंबईला निघाले होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाजवळील पेट्रोल पंपावर इंधन भरले.तेथून बाहेर पडताच काही अंतरावर त्यांना अंबर दिवा लावलेली गाडी आडवी आली. त्यातील एकाने पोलिसांचा गणवेश घातला होता. त्यांनी पिस्तुलच्या धाकाने त्यांच्या स्कॉर्पीओचा ताबा घेतला. तेथून त्यांना तळेगाव ढमढेरे येथे सोडले. तेथून काही अंतरावर गाडी सोडून देऊन ३१ लाख रूपयांची रोकड लांबविली.युनीट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन भोसले पाटील, युनीट तीनचे पोलिस निरीक्षक सिताराम मोरे, सहाय्यक निरीक्षक बाबर, धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, कर्मचारी पोलिस शिपाई गजानन सोनुने, प्रकाश लोखंडे, इम्रान शेख, सचिन जाधव, मोहन येलपल्ले, अशोक माने, राजू पवार, राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंह वसावे, प्रशांत गायकवाड, मेहबुब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुभाष पिंगळे, सुरेंद्र आढाव, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन यांच्या पथकाने ही कारवाई केली.गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला. युनीट एकचे पोलीस शिपाई गजानन सोनुने यांनी सीसीटीव्ही तपासले असता, त्यांना यातील मुख्य सूत्रधाराची माहिती मिळाली. त्यावरून तपास सुरू केला.सूरज राठोड आणि कमलेश धोंडी रोकड घेऊन फलटण येथे आढावच्या मूळ गावी जात असल्याची माहिती सोनुने यांना मिळाली. त्यावरून चांदणी चौक येथे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ लाख रोकड, दोन एअरगन आणि गाडी असा ३१ लाखांचा ऐवज जप्त केला, अशी माहिती उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे