आयर्न खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी विरोधात पुण्यात दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 21:33 IST2022-02-15T21:33:35+5:302022-02-15T21:33:46+5:30

पुण्यातील फरासखाना, लष्कर, वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे होते दाखल

Chargesheet filed against NCB judge Kiran Gosavi in Iron Khan drugs case in Pune | आयर्न खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी विरोधात पुण्यात दोषारोपपत्र दाखल

आयर्न खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी विरोधात पुण्यात दोषारोपपत्र दाखल

पुणे : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आयर्न खान याच्या ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरूद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाला २०१८ मध्ये मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून ३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी किरण गोसावीवर काहीही कारवाई केली नव्हती. बहुचर्चित आयर्न खान याला एनसीबीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याबरोबरचा फोटो किरण गोसावी याने व्हॉटसॲपवर टाकला होता. त्यावरुन पुण्यातील गुन्ह्यात हा पंच वाँटेड असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुणेपोलिसांनी त्याचा शोध घेऊन ऑक्टोंबरमध्ये त्याला अटक केली होती. त्याने ज्या महिलेच्या बँक खात्यावर हे पैसे घेतले. तिलाही पोलिसांनी अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर पुण्यात अशाच प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर व वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन किरण गोसावी व त्याच्या साथीदारांवर ३५० पानी दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले आहे. त्याचप्रमाणे लष्कर पोलिसांनीही सुमारे ५० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

Web Title: Chargesheet filed against NCB judge Kiran Gosavi in Iron Khan drugs case in Pune