शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर याच्यावर तब्बल ४० हजार पानांचं दोषारोप पत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 4:20 PM

८२ कोटी ३४ लाखांची अपसंपदा : ३८ कंपन्यांमधील गुंतवणुकीवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार

पुणे : नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर नोकरीच्या काळात उत्पन्नापेक्षा अधिक बेकायदा अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तब्बल ४० हजार पानांचे पहिले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. उत्पन्नापेक्षा तब्बल १२०० टक्के अधिक ८२ कोटी ३४ लाख ३४ हजार ९३९ रुपये अधिक बाळगल्याचा आरोप या दोषारोपात करण्यात आला आहे.

हनुमंत नाझीरकर, संगीता नाझीरकर, गीतांजली नाझीरकर, भास्कर नाझीरकर, राहुल खोमणे, अनिल शिपकुळे, बाळासाहेब घनवट आणि विजयसिंह धुमाळ  अशा ८ जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी हनुमंत नाझीरकर आणि राहुल खोमणे यांना अटक करण्यात आली असून ते दोघे ३० मार्चपासून न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. 

हनुमंत नाझीरकर हे सध्या नगर रचनामध्ये अमरावतीला सहसंचालक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांना निलंबित करण्यात आले आहे. २३ जानेवारी १९८६ ते १८ जून २०२० या ३४ वर्षामध्ये त्यांनी तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता लाचखोरीतून मिळविल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता तब्बल ११६२ टक्के अधिक आहे. 

हनुमंत नाझीरकर याच्या ३८ कंपन्या व त्यातील केलेल्या गुंतविलेला पैसा याविषयी दुसरे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या २० बेनामी मालमत्ताही आढळून आल्या आहेत. त्याबाबतची वेगळी कारवाई आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज हे दोषारोपपत्र शिवाजीनगर येथील न्यायालयात दाखल केले आहे. हनुमंत नाझीरकर याने ही मालमत्ता २०१० ते २०१६ दरम्यान आपली पत्नी आणि सासरे यांच्या नावावर खरेदी केली आहे. त्यातील किंमती या त्याने ज्यावेळी या मालमत्ता खरेदी केल्या, त्यावेळच्या किंमती आहेत. या सर्व मालमत्ता मोक्याच्या ठिकाणी असल्याने आजच्या बाजारभावानुसार त्यांच्या किंमती दुप्पट ते तिप्पट झाल्या असतील. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने आज सकाळी न्यायालय सुरु होण्यापूर्वीच ही सर्व कागदपत्रे न्यायालयात आणली होती. त्यामुळे कामकाज सुरु होताच ती दाखल करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय