शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तप्त

By admin | Updated: February 17, 2017 05:05 IST

पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींनी वातावरण तप्त झाले आहे. सभा, मेळावे

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरींनी वातावरण तप्त झाले आहे. सभा, मेळावे सुरू झाले आहेत. पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुण्यात अनेक ठिकाणी रोड शो आणि सभा घेतल्या. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘मागील अडीच वर्षात भाजप सरकार ने पुण्यासाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी पुण्यात येऊन सांगावे. राजकीय नेत्यांसोबत आता फिल्मी तारेही प्रचारात येऊ लागले आहेत. कॉँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी पुण्यात विविध ठिकाणी सभा घेतल्या. ‘‘या देशातील मुस्लिमांना भारत सोडून जाण्याची भाषा केली जाते़ परंतु, असे सांगणाऱ्यांना मला सांगायचे आहे, की हा देश आमचाही आहे़ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे, हे विसरु नका़ आमच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका, अशा शब्दांत त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. शिवसेनेतर्फे आमदार निलम गोऱ्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली आहे. (प्रतिनिधी)