शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

'Air India Plane Crash' : धावपट्टीवरील पाण्यामुळे ब्रेक न लागल्याने अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 2:41 AM

Air India Plane Crash in Kerla, Latest News एअर मार्शल भूषण गोखले : कोझिकोडे येथे आधीही झाल्या आहेत दुर्घटना

पुणे : कोझिकोडे येथील विमानतळावर झालेला अपघात दुर्देवी आहे. साधारणत: विमानतळाच्या धावपट्टीवर साचलेल्या पाण्यामुळे विमानाचे ब्रेक योग्य प्रकारे लागत नाहीत. केरळ येथील हवामान खराब असल्याने तसेच धावपट्टीवर पाणी साचल्याने ब्रेक लागूनही विमान घसरल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे, असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितले.

यापूर्वी मंगळूर येथे २०१० मध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी गोखले यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. ते म्हणाले, विमानतळाच्या धावपट्टीवरील साचलेले पाणी निघून गेलेले नाही. विमानतळावरील ड्रेनेज सिस्टिीम खराब असल्याने पाणी साचून राहिले. यामुळे विमानाचे ब्रेक लागले नाहीत. यामुळे विमान घसरून अपघात झाला. कोझिकोड येथील अपघातातील वैमानिक दीपक साठे हे हवाई दलातील अनुभवी वैमानिक होते. त्यांचा एअर इंडियातील अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांनी विमान योग्य पद्धतीने हाताळले असणार आहे. या अपघाताची कारणे शोधावी लागणार आहेत, असेही गोखले म्हणाले.वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यूमुंबई : केरळमध्ये कोझिकोड येथे शुक्रवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात मुख्य वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. ते अनुभवी वैमानिक होते. ते मूळचे मुंबईतील आहेत. साठे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ५८ व्या तुकडीचे विद्यार्थी होते. यानंतर एअर फोर्स अकादमीतून त्यांनी १९८१ साली वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. त्यांना ‘सॉर्ड आॅफ आॅनर’ने सन्मानित करण्यात आले होते. ३० जून २००३ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले.अतिशय उत्कृष्ट आणि अनुभवी वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती. विंग कमांडर दीपक साठेदुर्घटनेमुळे व्यथित-रामनाथ कोविंदविमान अपघाताबाबत ऐकून आपण व्यथित झालो असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, विमानातील जखमी प्रवासी, चालक दलाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मी केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्याशी बोललो आहे आणि माहिती घेतली आहे.भारतातील मोठे विमान अपघात१९५८ : गुडगावमध्ये (आता गुरुग्राम) विमान अपघातात ४ जणांचा मृत्यू७ जुलै १९६२ : एलिटालिया फ्लाइट ७७७ मुंबईत पहाडी भागात धडकले. ९४ जणांचा मृत्यू.२८ जुलै १९६३ : यूएईच्या विमानाचा मुंबईत अपघात : ६३ ठार.१९ सप्टेंबर १९६५ : सीमेवर पाकिस्तानने भारतीय नागरी विमान पाडले. ८ जणांचा मृत्यू.१४ जून १९७२ : जपान एअरलाइन्सचे विमान दिल्लीत विमानतळावर कोसळले. ८५ जणांचा मृत्यू.३१ मे १९७३ : दिल्ली विमानतळावर इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. ४८ जणांचा मृत्यू.१२ आॅक्टोबर १९७६ : मुंबईत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला आग, ९५ मृत्युमुखी.१ जानेवारी १९७८ : एअर इंडियाचे विमान मुंबईत बांद्रा किनाऱ्यालगत कोसळले. २१३ जणांचा मृत्यू.२१ जून १९८२ : मुंबईच्या सहार विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात. १७ मृत्युमुखी.१९ आॅक्टोबर १९८८ : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला अहमदाबादेत अपघात, १३३ जणांचा मृत्यू.१४ फेब्रुवारी १९९० : इंडियन एअरलाइन्सचे विमान बंगळुरुत कोसळले. ९२ जणांचा मृत्यू.१६ जुलै १९९१ : इंफाळमध्ये इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले. सर्व ६९ प्रवाशांचा मृत्यू.२६ एप्रिल १९९३ : इंडियन एअरलाइन्सचे विमान महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये रनवेवरुन उड्डाणानंतर ट्रकला धडकले. ५५ प्रवाशांचा मृत्यू.१२ नोव्हेंबर १९९६ : सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाची कझाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाशी हवेत धडक़ ३४९ लोकांचा मृत्यू.१७ जुलै २००० : पाटण्यात एलायन्स एअर विमानाला अपघात, ६० मृत्युमुखी.२२ मे २०१० : एअर इंडिया एक्सप्रेस विमान मेंगळुरु एअरपोर्टवर कोसळले. १५८ प्रवाशांचा मृत्यू.

टॅग्स :airplaneविमानPuneपुणेKeralaकेरळ