शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आयुक्तांसमोर टोळ्यांचे आव्हान

By admin | Updated: April 14, 2015 01:34 IST

शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरालगतच्या भागात आणि ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत.

पुणे : शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरालगतच्या भागात आणि ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँड माफियांनी पुण्यामध्ये टोळीयुद्धाला खतपाणी घातले. ‘खादी’च्या मागे लपून शहरभर फोफावणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना कसे रोखणार हाच खरा प्रश्न आहे. एके काळी पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुन्हेगारांची संख्या लक्षात घेता पोलिसांना ठोस पावले उचलावी लागतील. काही गुन्हेगारांनी जाणीवपूर्वक राजकीय झालर पांघरून आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. सध्या शहरात २२पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे या टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी नव्या दमाचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. पोलीस ठाणे स्तरावर पोलीस निरीक्षकांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे शहरात टोळीयुद्धाचा मध्यंतरी भडका उडाला होता. शहरातील खंडणी, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोऱ्या यांसोबतच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. यासोबतच महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिसांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवण्याबरोबरच खबऱ्यांचे तुटलेले जाळे पुन्हा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. बांधकाम व्यावसायिक निखिल राणे, दर्शना टोंगारे, डॉ. दाभोलकर यांचे खून याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. राणे आणि दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. तर टोंगारेंच्या खुनाचा तपास सीआयडी करीत आहे.गेल्या काही वर्षांत शहराच्या व्याप्तीबरोबर गुन्हेगारीचा आणि बेकायदा जमीन खरेदी-विक्रीचा आलेख कायमच वाढता राहिलेला आहे. एकेकाळी गुन्हेगारांना चळाचळा कापायला लावणाऱ्या पुणे शहर पोलीस दलाचा दरारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांत शहरात वाढलेले टोळीयुद्ध मोडीत काढण्याबरोबर कायदा- सुव्यवस्था आणि धार्मिक सौहार्द राखण्याचे आव्हान नवनियुक्त पोलीस आयुक्त कौशल कुमार पाठक यांच्यासमोर असणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचाही छडा अद्याप लागलेला नाही. त्यामुळे एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचे आव्हान नव्या आयुक्तांसमोर आहे.कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये झालेला बॉम्बस्फोट, १ आॅगस्ट २0१२ रोजी जंगलीमहाराज रस्त्यावर झालेले साखळी बॉम्बस्फोट तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेला बॉम्बस्फोट यामुळे पुणेही दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर असल्याचे अधोरेखित झाले आहे. कोंढव्यातील अशोका म्युजमधून इंडियन मुजाहिदीनचे चालणारे मोड्युल एटीएसने उघडकीस आणले होते. यासोबतच शहरातील अनेक तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी पकडण्यात आलेले आहे. शहरातील अनेक तरुण नक्षलवाद्यांच्या संपर्कात आहेत. नक्षलवाद्यांच्या हालचाली शहरात होत असल्यामुळे याकडे लक्ष देण्याचे आव्हान आहे. उघडकीस न आलेले महत्त्वपूर्ण खूननावदिनांकठिकाणसुरेश अलूरकर१४ डिसेंबर २००८कर्वे रस्ताकाशीनाथ कदम२३ फेब्रुवारी २०१०डेक्कन हरी ढमढेरे२४ मार्च २०११मित्रमंडळ कॉलनीप्रल्हाद जोगदनकर०२ मे २०१२पुणे विद्यापीठआशा लगड०३ जून २०१लक्ष्मी रस्ताडॉ. नरेंद्र दाभोलकर२० आॅगस्ट २०१३ओंकारेश्वर पूलसायबर गुन्ह्यांत वाढपुणे हे आयटी हब म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. राज्यात दाखल होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण पुण्यामध्ये आहे. आॅनलाईन फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार, महिलांची बदनामी, क्रेडिट कार्डसंदर्भातील गुन्हे अशा अनेक स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. तसेच शेकडो तक्रारीही येतात. परंतु सध्या या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ पोलिसांकडे नाही. त्यामुळे पोलिसांनाही या विषयातील ‘स्पेशलायझेशन’ करावे लागणार आहे.