शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चाकण, राजगुरूनगरच्या कचऱ्याला बिरदवडीकरांचा विरोध

By admin | Updated: September 22, 2014 05:31 IST

दूषित पाणी प्यावे लागतेय, दुर्गंधी, माशा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटविला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत

आंबेठाण : दूषित पाणी प्यावे लागतेय, दुर्गंधी, माशा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटविला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत, अशा अनेक तक्रारी करीत बिरदवडी ( ता.खेड ) येथील ग्रामस्थांनी चाकण आणि राजगुरुनगर येथून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून माघारी पाठविल्या.पुन्हा या ठिकाणी गाड्या आणल्या तर हिंसक आंदोलन करू असा इशाराही वाहनचालकांना दिला. बिरदवडी (ता.खेड) गावाच्या दक्षिणेला परंतु खराबवाडी गावाच्या हद्दीत उंचावर मोठी खाण आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी चाकण आणि राजगुरुनगर ग्रामपंचायतीचा दररोजचा कचरा या ठिकाणी टाकला जातो. गावातील जवळपास १५० युवकांनी एकत्र येऊन आज या कचऱ्याच्या गाड्या अडविल्या. चाकण येथून २ टेम्पो, २ ट्रॅक्टर, आणि एक लहान रिक्षा अशा पाच गाड्या दररोज २-२ वेळा कचरा टाकतात. राक्षेवाडी येथील एक दिवसाआड एक टेम्पो कचरा आणि राजगुरुनगर येथून १ टेम्पो आणि १ ट्रॅक्टर कचरा दररोज टाकला जातो.येथे कचऱ्याचे मोठमोठे ढीग जमा झाले आहेत. यापैकी काही कचरा खाणीत पडत असून, खाणीतील पाणी किंवा पावसाने येणारे पाणी या ठिकाणी कचऱ्यात मुरत असल्याने ते दूषित होत आहे. ते पाणी उताराच्या दिशेने म्हणजेच बिरदवडी (ता.खेड) गावाच्या दिशेने निचरा होत आहे. दूषित पाणी निचरा होत असल्याने बिरदवडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ठिकाणी असणाऱ्या पवार वस्ती, काळडोके वस्ती, फडके वस्ती या ठिकाणावरील ग्रामस्थ त्रस्त झाले असून दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजार जडत आहेत. येथून जवळूनच चाकण- वांद्रा रस्ता आहे. या धुराच्या वासामुळे या रस्त्याने प्रवास करणेदेखील मुश्कील झाले आहे. कचऱ्याच्या ढिगावर भटकी कुत्री फिरकत असल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. या आंदोलनप्रसंगी मराठा महासंघाच्या आशा काळडोके, सुभाष पवार, नवनाथ चौधरी, भागाजी पवार, अमोल परदेशी, रामदास फडके, शैलेश फडके, राजेंद्र कारके, विजय पवार, ओमकार पवार, युवराज पवार, सुनील काळडोके, सोमनाथ काळडोके, विजय चव्हाण, राहुल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)