पुणे: देशभरात पुढील वर्षी मार्चपासून सुरू होणाऱ्या जनगणनेत मोबाइल ॲपचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासून तयारी सुरू केली आहे. हे काम प्रगणक आणि पर्यवेक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. करण्यात येणार आहे. त्याद्वारे येत्या १६ मे ते १५ जूनदरम्यान जिल्ह्यात घरगटांची यादी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि संबंधित कॅन्टोन्मेंट मंडळांची सोमवारी (दि. १६) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील जनगणनेचे कामकाज सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापक प्रशासकीय उपक्रम असून त्यासाठी तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचित करण्यात आले.
अशी असेल कार्यपद्धती
प्रत्येक तालुक्यात, कँटोन्मेंट बोर्डासह नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात प्रगणक, पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी. प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सरकारने जनगणनेबाबत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत नियुक्ती करण्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. जनगणनेसाठी घरांची यादी (हाउस लिस्टिंग) तयार करायची असून, ७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या १८० ते २०० घराला एक ब्लॉक मानले जाईल. एका ब्लॉकला एक प्रगणक नियुक्त करण्यात यावा. सहा प्रगणकांवर एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रगणकाच्या मोबाइलमध्ये जनगणनेचे ॲप डाऊनलोड करून त्यांच्याद्वारे घरांची यादी, ब्लॉकयादी व तयार केली जाईल. जनगणनेत डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन, तांत्रिक अडचणींचे वेळेत निराकरण आणि सर्व विभागांमधील समन्वय यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
Web Summary : India's next census begins next year, utilizing a mobile app. From May 16 to June 15, house listings will be prepared. Training and manpower allocation are underway for a smooth, planned process.
Web Summary : भारत में अगली जनगणना अगले साल शुरू होगी, जिसमें मोबाइल ऐप का उपयोग किया जाएगा। 16 मई से 15 जून तक घरों की सूची तैयार की जाएगी। सुचारू और योजनाबद्ध प्रक्रिया के लिए प्रशिक्षण और जनशक्ति आवंटन जारी है।