शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाचा मृत्यू झाल्यास बिल माफ

By admin | Updated: August 22, 2015 02:19 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णाचे वैद्यकीय बिल माफ करण्यात येणार आहे

पुणे : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णाचे वैद्यकीय बिल माफ करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय बोर्डाच्या आरोग्य समितीने घेतला आहे. त्यामुळे रुग्ण दगावल्यानंतर यापुढे नातेवाइकांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल केली जाणार नाही.मे महिन्यात बोर्डाच्या रुग्णालयामध्ये २ रुग्ण उपचार सुरू असताना मरण पावले होते. एका रुग्णाच्या उपचारांचे ५ हजार, तर अन्य एका रुग्णाचे २ हजार ६०० रुपये वैद्यकीय बिल झाले होते. रुग्ण दगावल्यानंतर आप्तांकडून बिल वसूल करण्याचा प्रकार योग्य नसल्याबाबत आरोग्य समितीच्या बैठकीत मत व्यक्त झाले. त्यानंतर यापुढे रुग्ण दगावल्यास संबंधित रुग्णाच्या आप्तांकडून वैद्यकीय बिलाची थकबाकी वसूल न करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, बोर्डाच्या विविध रुग्णालयांमध्ये जानेवारी ते जून या कालावधीत दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने आरोग्य समितीत सादर केला. गेल्या ६ महिन्यांत ४९ हजार १५६ रुग्णांवर विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलमध्ये ३२ हजार ८८१, परमार डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार १६८, मार्केट डिस्पेन्सरीमध्ये ४ हजार ४३२ आणि घोरपडी डिस्पेन्सरीमध्ये ७ हजार ६७५ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)