The car was punctured and the family was beaten and robbed by accussed | कार पंक्चर झाल्याने थांबलेल्या कुटुंबाला मारहाण करून लुटले; पुणे- सोलापूर महामार्गावरील घटना 

कार पंक्चर झाल्याने थांबलेल्या कुटुंबाला मारहाण करून लुटले; पुणे- सोलापूर महामार्गावरील घटना 

ठळक मुद्देभिगवण पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल

बारामती : कार पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबलेल्या कुटुंबाला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर ३ च्या  हद्दीत घडली .पोलिसांनी संशयितांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.भिगवण पोलीस स्टेशन तर्फे देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे .

घटनेच्या त्यादिवशी रात्री ९.३० चे सुमारास फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह पुणे येथे निघाले होते.यावेळी त्यांची कार पंक्चर झाली. पंक्चर काढण्यासाठी  पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज नंबर 3 या गावच्या हद्दीत  महामार्ग  लगत ते थांबले होते. दरम्यान दोन संशयित व्यक्ती व त्यांच्यासोबत असणाऱ्या आणखी तीन लोकांसह तिथे आले. त्यांनी या कुटुंबाला मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटले. भिगवण पोलिस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.


    पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचे सोबतचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे. आपण संशयितांना ओळखत असाल तर भिगवण पोलीस स्टेशनचे खालील नंबरवर संपर्क करून माहिती द्यावी.माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले .संशयितांबाबत सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने -९८३४५५३३००, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख - ८६०५०५७७८८ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The car was punctured and the family was beaten and robbed by accussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.