कॅनन क्रिकेट क्लबचा तिकोने गुरुकुलवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST2021-03-05T04:11:38+5:302021-03-05T04:11:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखानाच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चौदा वर्षांखालील गटात ...

Canon Cricket Club wins over Tikone Gurukul | कॅनन क्रिकेट क्लबचा तिकोने गुरुकुलवर विजय

कॅनन क्रिकेट क्लबचा तिकोने गुरुकुलवर विजय

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राधिकरण जिमखानाच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चौदा वर्षांखालील गटात प्रदनील थोरातच्या ५८ धावांच्या खेळीच्या जोरावर कॅनन क्रिकेट क्लब संघाने तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा पाच गडी राखून पराभव केला.

निगडीच्या मदनलाल धिंगरा मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाने २५ षटकांत ६ बाद १४४ धावा केल्या. हे आव्हान कॅनन क्रिकेट क्लब संघाने १९ षटकांत ५ बाद १४५ धावा करून पूर्ण केले. सामन्याचा मानकरी ४७ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५८ धावा करणारा प्रदनील थोरात ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी:

तिकोने क्रिकेट गुरुकुल : २५ षटकात ६ बाद १४४ धावा, अद्वैत कोतवाल ७१, पियुष पवार नाबाद २५, प्रणव यादव २-३०, अथर्व सिंग १-३५, रोशन शेख १-१४, कौस्तुभ नाईकवाडी १-१५ पराभूत वि. कॅनन क्रिकेट क्लब : १९ षटकात ५ बाद १४५ धावा, प्रदनील थोरात ५८, पियुष यादव २४, ओमकार वाईकर २१, प्रणव यादव १९, आदित्य तिकोने २-२१

Web Title: Canon Cricket Club wins over Tikone Gurukul