उमेदवारी आणि विकासकामे हे वेगवेगळे ; गिरीश बापट यांचा अजित पवारांना टाेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:29 IST2019-04-03T19:20:46+5:302019-04-03T19:29:11+5:30

उमेदवारी आणि विकासकामे या दाेन वेगवेगळ्या गाेष्टी असून त्या अजित पवारांना माहित असायला हव्यात असा टाेला भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी पवारांना लगावला.

candidate and development work are two different things; girish bapat to ajit pawar | उमेदवारी आणि विकासकामे हे वेगवेगळे ; गिरीश बापट यांचा अजित पवारांना टाेला

उमेदवारी आणि विकासकामे हे वेगवेगळे ; गिरीश बापट यांचा अजित पवारांना टाेला

पुणे : काम केली तर भाजपाने पुण्याचा उमेदवार का बदलला असा प्रश्न अजित पवार यांनी भाजपाला केला हाेता. त्याला उत्तर देताना उमेदवारी आणि विकासकामे या दाेन वेगवेगळ्या गाेष्टी असून त्या अजित पवारांना माहित असायला हव्यात असा टाेला भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांनी पवारांना लगावला. 

निवडणुकीच्या प्रचारासंबंधी माहिती देण्यासाठी  आयाेजित पत्रकार परिषदेत बापट बाेलत हाेते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित हाेते. काल काॅंग्रेसभवन येथे झालेल्या आघाडीच्या बैठकीत भाजपाने पुण्यात विकासकामे केली तर उमेदवार का बदलला असा प्रश्न केला हाेता. त्याला बापट यांनी आज प्रतिउत्तर दिले. बापट म्हणाले, उमेदवारी आणि विकासकामे या दाेन वेगवेगळ्या गाेष्टी आहेत. उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक असतात. उमेदवारी काेणाला द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे या दाेन्ही गाेष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. 

दरम्यान भाजपाने प्रचाराची हायटेक तयारी केली असून प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या डिस्प्ले व्हॅनचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. 

Web Title: candidate and development work are two different things; girish bapat to ajit pawar