शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करा : मंत्री नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 10:55 PM

तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस सरकारने हे केले होते मानधन सुरू

पुणे: आणीबाणी विरोधकांना सरकारने सुरू केलेले दरमहाचे मानधन बंद करण्याची मागणी काँग्रेसचेनितीन राऊत यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केल्याने या काळात तुरूंगवास सोसलेल्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले होते. आणीबाणीच्या विरोधात तत्कालीन जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी काम केले होते. आणीबाणीनंतर काही वर्षांनी जनता पक्षातून फूटून त्याच जनसंघीयांनी भारतीय जनता पाटीर्ची स्थापन केली. ते बहुतेकजण आता वृद्ध झाले आहेत. त्याची सरकारी पैशाने सोय लावण्यासाठी म्हणून तत्कालीन सरकारने हे मानधन सुरू केले असल्याचे मत व्यक्त करून राऊत यांनी मानधन बंद करावे असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. तुरूंगात गेलेले हयात असतील तर त्यांना १० हजार व हयात नसतील तर त्यांच्या पत्नीला ५ हजार याप्रमाणे हे मानधन दिले जाते. बिहार तसेच उत्तरप्रदेश सरकारनेही असे मानधन सुरू केले असून केंद्र सरकारकडून त्यात वाढ व्हावी असा प्रयत्न सुरू असतानाच मंत्री राऊत यांच्याकडून ते बंद करण्याची मागणी झाल्यामुळे आणीबाणी विरोधक संतापले आहेत.पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांनी याबाबत शुक्रवारी थेट राऊत यांनाच मोबाईलवर संपर्क करून आपला रोष व्यक्त केला. एकबोटे म्हणाले, राऊत राजकारणात असूनही त्यांना आणीबाणीची काहीच माहिती नाही. देशात आणीबाणीला पहिला विरोध पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध झाला. त्यात जनसंघाचे लोक होते. त्यांच्यासमवेत अनेक पुरोगामी लोकही तुरूंगात गेले. देशात सर्वत्र हाच प्रकार होता. आता ते सर्वच कार्यकर्ते राजकारणातून निवृत्त झाले असून वृद्ध झाले आहेत. त्यांची कौटुंबिक आर्थिक अवस्था चांगली नाही. त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्याच भावनेतून फडणवीस सरकारने हे मानधन सुरू केले आहे.त्याला अजून वर्षही झाले नाही तोच सत्ताबदल झाला व आता राऊत लगेचच मानधन बंद करण्याची मागणी का करत आहेत तेच कळत नाही. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगेचच पंतप्रधानपद स्विकारलेल्या राजीव गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात देशवासियांची माफी मागितली होती हे तरी राऊत यांनी लक्षात घ्यायला हवे होते असे मत एकबोटे यांनी व्यक्त केले. राऊत काय म्हणाले त्याची माहिती देताना एकबोटे म्हणाले, मी त्यांच्याकडे माझा संताप व्यक्त केला आहे. पत्र दिल्याचे त्यांनी मान्य केले. मी पत्र मागे घ्या अशी मागणी केल्यानंतर त्यांनी याविषयाची अधिक माहिती घेऊन विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे एकबोटे यांनी सांगितले.      

टॅग्स :PuneपुणेNitin Rautनितीन राऊतcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस