शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:58 AM

पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत

हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभेची जागा भाजप की शिंदेसेनेला मिळणार, याविषयी संभ्रम असतानाच बहुजन विकास आघाडीला महायुतीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुतीमध्ये बविआला घेऊन त्यांच्या उमेदवाराला कमळ चिन्हावर उभे केले जाण्याबाबत चाचपणी सुरू आहे. 

मनोर येथील सायलेंट रिसॉर्ट येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोअर कमिटी, पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, अशा चार विधानसभांचे केंद्रप्रमुख, बूथप्रमुख, सुपर वॉरियर यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महायुतीचे घटक म्हणून भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे चिन्ह घेऊन महायुतीचा उमेदवार आपल्यासमोर दिला जाईल. त्याचबरोबरीने ‘बविआ’ हा चौथा पर्याय उपलब्ध झाल्यास लग्न आपल्या घरचे आहे, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, त्यामुळे सर्वांनी जोरकस प्रयत्न करून महायुती जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणायचे आहे, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना दिल्या.

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर काही घटक पक्ष महाविकास आघाडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. पालघर लोकसभेतही हे चित्र दिसू लागल्याने कुठल्याही स्थितीत महायुतीलाच विजयी करण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. मनोरच्या बैठकीत महायुतीतून फक्त भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदेसेनेचे खा. राजेंद्र गावित यांच्यासह महायुतीमधील एकाही प्रमुख पदाधिकाऱ्याला या बैठकीला बोलाविण्यात आले नव्हते. 

टॅग्स :palghar-pcपालघरBJPभाजपाHitendra Thakurहितेंद्र ठाकूरMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४