शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

आजच्या लोकप्रतिनिधींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना होऊ शकते का? अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 5:17 PM

यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे..

पुणे : रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला.

रेल्वे अपघात झाल्यानंतर लालबहाददूर शास्त्री यांच्यासह त्या काळात अनेक मंत्र्यांनी त्या त्या वेळच्या घटना पाहून राजीनामे दिले होते. आजच्या लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी तुलना होऊ शकते का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी राजकारणात नसताना न्यायालयाने जरी ताशेरे ओढले तरी राजीनामा दिल्याचे पाहिले आहे. आत्ता काय घडतंय हे आपण पाहातच आहोत. प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, असे सांगून निशाणा साधला. 

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आजवर ज्या लोकप्रतिनिधींवर आरोप झाले, ते लोक पदापासून बाजूला झाले. याविषयी विचारले असता त्यांनी लालबहाददूर शास्त्री यांचा दाखला देत आरोप झालेल्या एका मंत्र्याचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी छेडले असता, मी सुरुवातपासून म्हणत आहे. कोणत्याही घटनेचा तपास अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य बाहेर येत असताना जर कोणाची चूक असेल तर त्याला शासन झाले पाहिजे. पण अंतिमत: चौकशीतून सत्य बाहेर येईल. त्यावर  पूजा चव्हाण प्रकरणी संबधित मंत्री नॉट रिचेबल आहेत. बोलत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घटनेत प्रतिक्रिया दिली. आता नेमकं काय झालं?  त्यावर जेव्हा मी त्यांना भेटेन. तेव्हा त्यांना नक्की सांगेन की माध्यमातील मंडळी तुमची आत्मीयतेने वाट पाहत आहेत. एकदा पुढे या अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. हसन मुश्रीफ यांनी असा आरोप केला होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोटाळ्यात अडकवले याविषयी विचारल्यानंतर पवार यांनी यामध्ये तथ्य असेल तर कारवाई नक्की होईल. आता ज्या गोष्टी झाल्या त्या उगाळणं चांगलं नाही असे सांगून अजित पवार यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

पेट्रोल इंधन दरवाढीबाबत मागच्या सरकारवर खापर फोडले जात आहे, त्याविषयी बोलताना पवार यांनी या सरकारला जनतेने निवडून दिले आहे.मागच्या सरकारने जर काही चुका केल्या असतील तर त्यात सुधारणा करण्याचे काम या सरकारचे आहे. एकमेकांवर टोलवाटोलवी करण्यात काही अर्थ नाही. परभणीमध्ये पेट्रोलचे दर 100 रूपयांच्या पुढे गेले आहेत. ते कमी झाले पाहिजेत.  भाजपच्या पक्षातील लोकांना पण हे वाटत आहे. पण कुणी बोलू शकत नाही. ही दरवाढ कमी झालीच पाहिजे ही माझीच नाही तर सर्वसामान्यांची भावना आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त होऊन गेला आहे. ज्यावेळी राज्याचा अर्थसंकल्प मांडेन त्यावेळी कोणत्या गोष्टीचा टॅक्स वाढवणार आणि कोणता कमी करणार हे निश्चित सांगेन

राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत कोरोनाचे कारण पुढे करीत आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे याकडे लक्ष वेधले असता जर आम्ही घाबरलो असतो तर आम्ही राजीनामा देऊ दिला असता का? त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला आहे. विरोधक सातत्याने हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात. विरोधक सारखे तीन महिने वाढवत आहे. आता सरकारला सव्वा वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाल पूर्ण करेल. तिन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत. पवार साहेबांचे आम्ही मार्गदर्शनही घेत आहोत असे अजितदादा म्हणाले.---------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारSanjay Rathodसंजय राठोडDhananjay Mundeधनंजय मुंडे