शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:33 AM

1 / 6
जगातील घातक शस्रास्त्रांची स्पर्धा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे एकापेक्षा एक विध्वंसक हत्यारं समोर येत आहेत. या दरम्यान, अमेरिकेने सहाव्या पिढीतील विमानाची झलक दाखवत खळबळ उडवली आहे. या लढाऊ विमानाचं नाव बी-२१ रायडर बॉम्बर. या विमानाचे फोटो समोर आले आहे.
2 / 6
नोव्हेंबर २०२३ मध्ये या विमानाने पहिलं उड्डाण केलं आहे. त्यावेळी हे विमान चाचणीच्या पातळीवर होते. ३० वर्षांमध्ये पहिल्यांदा अमेरिकेने कुठलंही स्टेल्थ बॉम्बवर्षक विमान बनवलं आहे. अमेरिकन हवाई दलाने या विमानाची जी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये विमानाचे वेगवेगळे स्टेज दिसत आहेत. त्यात हे विमान टेक ऑफ करताना, हवेत उडताना आणि एडवर्ड्स हवाई तळावर उभं असलेलं दिसत आहे.
3 / 6
डिसेंबर २०२२ मध्ये बी-२१ ला अधिकृतपणे समोर आणण्यात आलं होतं. मात्र त्याबाबतची माहिती खूप मर्यादित ठेवण्यात आली होती. या विमानाच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचं झालं तर याचा विंगस्पॅन सुमारे १४० फूट आहे. पुढच्या एक दशकामध्ये अमेरिकन एअरफोर्स बी-१एस च्या ४५ आणि बी-२एस च्या प्लीटला १०० बी-२१एस द्वारे बदलू इच्छित आहे.
4 / 6
अमेरिकेकडून करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार हे विमान कुठल्याही रडारवर दिसणार नाही. तसेच ते कुठलाही सुगावा लागू न देता शत्रूच्या हद्दीत घुसेल आणि लक्ष्य उद्ध्वस्त करून माघारी फिरेल. याची निर्मिती नॉर्थरोप ग्रुम्मन कंपनीने केली आहे. हे विमान पूर्णपणे डिजिटल आणि लाँग रेंज स्ट्राइक बॉम्बर आहे. या विमानाची बांधणी करताना चहुबाजूंनी असे धातू आणि पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ते रडारच्या नजरेत येत नाही.
5 / 6
हे विमान ताशी २००० किमी वेगाने उड्डाण करेल. कुठल्याही स्टेल्थ बॉम्बरसाठी हा खूप अधिक वेग आहे. तसेच हे विमान ५० ते ६० हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकते.
6 / 6
हे विमान आण्विक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या हत्यारांसहीत हल्ला करू शकते. हे विमान ओपन सिस्टिम आर्किटेक्चरच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यात कुठल्याही क्षणी अपडेट केले जाऊ शकतात. डिजिटल बॉम्बर असल्याने याची इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरला एकाच जागेवर कंट्रोल करता येऊ शकते.
टॅग्स :United StatesअमेरिकाDefenceसंरक्षण विभागairplaneविमानInternationalआंतरराष्ट्रीय