शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या

By अनिकेत घमंडी | Updated: May 24, 2024 06:10 IST

येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 

अनिकेत घमंडी/मुरलीधर भवार -

डोंबिवली : डोंबिवली शहर गुरुवारी दुपारी जबर स्फोटांच्या आवाजांनी हादरले. एमआयडीसीत रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आठजण ठार, तर ६० जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर  आहे. या दुर्घटनेमुळे २०१६ मध्ये याच परिसरात प्रोबेस या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटांच्या कटु आठवणी जागृत झाल्या.

येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. 

अनेक इमारतींना हादरे; काचा फुटल्याएमआयडीसीतील हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की पाच किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. तसेच स्फोटामुळे आसपासच्या आठ कारखान्यांना आगीच्या ज्वाळांनी लपेटले. परिसरातील निवासी इमारती, दुकाने, हॉटेल यांना भूकंप व्हावा तसे हादरे बसले. अनेक इमारतींच्या तर काचा फुटल्या. 

स्फोटानंतर कारखान्याला आग लागून धुराचे प्रचंड लोट अवकाशात पसरले. स्फोटाने भयभीत झालेल्या महिला, मुलांनी वाट मिळेल तिथे सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीचे लोळ, काळाकुट्ट धूर परिसरात पसरल्याने शहरभर भीती पसरली होती. एका मागोमाग एक तीन ते चार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शाई कंपनीला आग, थिनरच्या ड्रमचे स्फोट -नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील वर्षा प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यात कंपनीचे कार्यालय, कारखान्यातील मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला. या आगीत कंपनीत असलेल्या थिनरच्या ड्रमचे स्फोट झाल्यामुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली होती. सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन पथकाला यश आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Blastस्फोटfireआगdombivaliडोंबिवली