'तसल्या' कामासाठी मुलगी देतो म्हणून सेल्स मॅनेजरला बोलावले अन् अपहरण करून उकळले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:17 IST2022-12-06T12:16:28+5:302022-12-06T12:17:14+5:30

पुण्यात 17 ते 19 वर्ष वयाच्या चार तरुणांवर गुन्हा दाखल...

Called the sales manager and kidnapped and extorted money as he was giving a girl for 'that' job | 'तसल्या' कामासाठी मुलगी देतो म्हणून सेल्स मॅनेजरला बोलावले अन् अपहरण करून उकळले पैसे

'तसल्या' कामासाठी मुलगी देतो म्हणून सेल्स मॅनेजरला बोलावले अन् अपहरण करून उकळले पैसे

पुणे/किरण शिंदे : शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे सांगून 53 वर्षीय व्यक्तीला बोलावून घेतले. त्यानंतर मारहाण करत त्याचे अपहरण करून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात हा प्रकार घडला असून 17 ते 19 वर्ष वयाच्या चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धीरज वीर (वय 19) आणि जॉय मंडल (वय 19) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी परिसरातच राहणाऱ्या एका 53 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. 3 नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे एका नामांकित कंपनीत सेल्स मॅनेजर कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची एका लॉजवर आरोपी तरुणांसोबत ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी फिर्यादी यांना शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे बोलून बंडगार्डन परिसरात बोलावून घेतले. फिर्यादी त्या ठिकाणी स्वतःच्या गाडीने आले असता आरोपीने जबरदस्ती करत आणि मारहाण करत फिर्यादी यांचे अपहरण केले. मारहाण करत फिर्यादी यांचे एटीएम कार्ड काढून घेतले आणि येरवडा परिसरातील एका एटीएम मधून 25000 रुपये त्यांनी जबरदस्तीने काढले. 

आरोपींनी फिर्यादी यांना मुलीसोबत लॉजवर जातो हे पत्नीला सांगून बदनामी करतो अशी धमकी दिली. याविषयी पोलिसांना सांगितले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारतो अशी देखील धमकी दिली होती. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून 93 हजार रुपये खंडणी स्वरूपात आरोपींनी उकळले होते. दरम्यान आणखी पैशाची मागणी होत असल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Called the sales manager and kidnapped and extorted money as he was giving a girl for 'that' job