आळेफाटा येथे थांबविल्या बस

By Admin | Updated: June 24, 2015 05:12 IST2015-06-24T05:12:01+5:302015-06-24T05:12:01+5:30

माळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस आज सकाळी आळेफाटा बस स्थानकात थांबविण्यात

The bus stopped at Aleppo | आळेफाटा येथे थांबविल्या बस

आळेफाटा येथे थांबविल्या बस

आळेफाटा : माळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस आज सकाळी आळेफाटा बस स्थानकात थांबविण्यात आल्या प्रथम चाकण खोपोली मार्गे वळवण्यात आलेली बसची वाहतूक दुपारी अडीच वाजता माळशेज घाट मार्गे सुरू करण्यात आली.
माळशेज घाटात मध्यरात्रीनंतर जोरदार मोसमी पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस आज सकाळी आळेफाटा बस स्थानकात थांबविण्यात आल्या.
साडेदहाच्या सुमारास प्रथम चाकण - खोपोली मार्गे ही वाहतूक वळविण्यात आली. तर, काही बस पुन्हा अहमदनगर कडे सोडण्यात आल्या.
दुपारच्या वेळी माळशेज घाटातील वाहतूक एकेरी सुरू झाल्याची माहिती आळेफाटा वाहतूक नियंत्रक मिळाल्यावर या मार्गावरून पहिली एसटी बस दुपारी अडीच वाजता सोडण्यात आली.

Web Title: The bus stopped at Aleppo