अचानक ब्रेक मारला; बसची ट्रकला जोरदार धडक, २० ते २२ जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:40 IST2025-11-12T11:39:58+5:302025-11-12T11:40:54+5:30
पुणे नाशिक महामार्गावर ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर देवदर्शनाला जाणारी खासगी बस ट्रकला जोरात धडकली

अचानक ब्रेक मारला; बसची ट्रकला जोरदार धडक, २० ते २२ जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना
अवसरी : पुणे - नाशिक महामार्गावर नंदी चौकात मालवाहतूक ट्रक व खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमध्ये चाळीस प्रवासी होते. त्यापैकी अंदाजे २० ते २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अपघात मंगळवार दिनांक ११ रोजी साडेआठ वाजल्याच्या दरम्यान घडला असून खासगी बस पुण्यावरून नागपूरकडे जात असताना मालवाहतूक ट्रकला मागून धडकल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवदर्शनासाठी निघालेल्या दोन बस रात्रीच्या वेळी आळंदी येथून भीमाशंकर येथे जात होत्या. मंगळवार दिनांक.११ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर नंदी चौकात ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी खाजगी बस ट्रकला जोरात धडकली. यात बसचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. यावेळी पुढील आसनांवरील अनेक भाविक जखमी झाले आहेत. ते सर्व भाविक नागपूर येथील आहेत. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलीस उपनि हगवणे, अविनाश दळवी, संपतराव. कायगुडे यांच्यासह पथकाने घटना रुग्णालयात डॉ. विवेकानंद फसाले, डॉ. अश्विनी घोडे यांच्या पथकाने प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली.