'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:14 AM2024-05-22T11:14:01+5:302024-05-22T11:17:54+5:30

Ravindra Dhangekar : पुण्यातील कार अपघातावरुन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

Builder lobby in Pune works for BJP Ravindra Dhangekar alleges Devendra Fadnavis | 'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप

'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप

Ravindra Dhangekar ( Marathi News ) : "देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने पुण्यात आले आहेत. ते आल्यानंतर बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते. फडणवीस पुण्यात लोकांना दाखवण्यापुरते आणि पुणेकरांचं समाधान करण्यासाठी आले होते. पण, यामध्ये चुकीच्या पद्धतीने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हे फक्त दाखवण्यासाठी देखावा होता असं माझं मत आहे, असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला. 

काही दिवसापूर्वी पुण्यात बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मध्यरात्री दारुच्या नशेत दोन बळी घेतले. नोंदणी नसलेली पोर्शे कार बेदरकारपणे चालवून, दोघांना आयुष्यातून उठवून देखील या अब्जाधीश बिल्डर बाळाला १५ तासांतच शुल्लक अटींवर जामीन मिळाल्याने पुण्यातच नाही तर राज्यभरातून या रेड कार्पेटवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत कारवाईच्या सूचना दिल्या. यावरुन आता काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?

"तिथे असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे, त्या रात्री त्या पोलिसांनी प्रचंड माया जमा केली. त्या मुलाविरोधात कोणतीही गंभीर कलम नव्हती. पुणेपोलिसांनी या प्रकरणात पैसे घेतले आहेत. पैसे घेऊन त्या मुलाला फाईव्ह स्टार सारखी ट्रिटमेंट दिली. तो बिल्डर आधीच पुणे महानगरपालिकेत डिफॉल्टर आहे. त्यांच्या सगळ्या कामांचे ऑडिट झालेलं नाही, त्यांच्याकडून पुणे महानगरपालिकेला भरपूर पैसे येणे बाकी आहे. अशी बिल्डर लॉबी आज पुण्यात भाजपासाठी काम करते, आमच्या पुणेकर लोकांचा बळी जात असताना जर तुम्ही पिझ्झा पार्टी करत असाल तर हा कायदा गरीबांसाठी आहे की नाही? असा सवालही धंगेकर यांनी केला. 

रवींद्र धंगेकर म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, पुण्यातील पब संस्कृती बंद झाली पाहिजे. ज्या दिवशी पोलीस आयुक्तांनी रात्री दिड वाजेपर्यंत परवानगीची नियमावली केली, तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं. अनेक पोलीस त्यांना मदत करतात. महिला पोलीस कॉन्टेबलही तिथे असतात, याच आम्हाला वाईट वाटतं, असंही धंगेकर म्हणाले. ज्यावेळी पुणेकर रस्त्यावर उतरले तेव्हा या सगळ्यांना जाग आली. यामध्ये मोठी लॉबी काम करत आहे. पुणेकरांना पब संस्कृती बदनाम करत आहे. वेळ पडली तर आम्ही आंदोलन करणार, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले. 

कोणत्याही पबला अधिकृत परवाना नाही

पुण्यातील कोणत्याही पबला अधिकृत परवाना नाही, एक्साईज खाते काय करत आहे. पोलिसही पैसे गोळा करण्याचं काम करत आहे. मग अशा याच्यात जनतेला न्याय कसा मिळणार? अगरवाल यांचे अनेक उद्योग आहे, त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे. नाहीतर आज बिल्डर लॉबी आज त्यांना जाऊन भेटेल आणि कागदावरच त्यांचा तपास राहिलं, असंही धंगेकर म्हणाले. हे बिल्डर डिफॉल्टर असल्यामुळे यांचे भाजपशी सलग्न त्यांचे कारभार आहेत. पुण्याचे अनेक बिल्डर भाजपबरोबर काम करतात. यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घातलील, असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. 

Web Title: Builder lobby in Pune works for BJP Ravindra Dhangekar alleges Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.