कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:44 IST2026-02-05T17:05:42+5:302026-02-05T18:44:53+5:30

या घटनेनंतर पतीने रुग्णालयातील डाॅक्टरांना खोटी माहिती दिली, तसेच घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता

Brutally beaten up over family reasons; False information after admitting to hospital, three people including husband arrested in wife's murder case | कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक

कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक

पुणे : महिलेचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांकडून पतीसह तिघांना अटक करण्यात आली. भवानी पेठेत ही घटना घडली होती. वैष्णवी उर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (२३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (२८), मनोज रोहिदास कांबळे (३९), वनिता मनोज कांबळे (३२) यांना अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक आहे. २८ जानेवारी रोजी त्याच्या कौटुंबिक कारणावरून वैष्णवीशी वाद झाला होता, वैष्णवीला त्याने बेदम मारहाण केली होती. 

तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती. या घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार करीत आहेत.

Web Title : पुणे: पारिवारिक विवाद में महिला की हत्या; पति, दो अन्य गिरफ्तार।

Web Summary : पुणे में पारिवारिक विवाद के बाद एक महिला, वैष्णवी तुपसौंदर्य, की उसके पति ने हत्या कर दी। उसने उसे बुरी तरह पीटा और अस्पताल में झूठी जानकारी दी। पति और दो साथी गिरफ्तार; पुलिस जांच जारी है।

Web Title : Pune: Woman killed over family dispute; husband, two others arrested.

Web Summary : A Pune woman, Vaishnavi Tupsaundarya, was murdered by her husband after a family dispute. He severely beat her and provided false information at the hospital. The husband and two accomplices are arrested; police investigation ongoing.