शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘बीआरटी’चे थांबे असुरक्षित : अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 7:57 PM

जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे.

ठळक मुद्देमार्गांवर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प

पुणे : कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात उभारलेले बीआरटी मार्ग बस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. मार्गातील बहुतेक सर्व थांब्याचे दरवाजे सताड उघडे असल्याने प्रवासी धोकादायक पध्दतीने बसची वाट पाहत उभे राहत आहेत. थांब्यांमधील डिजिटल फलक बंद असल्याने प्रवाशांना बसचा ठावठिकाणा समजत नाही. अनेक थांब्यांमध्ये अस्वच्छता व अन्य लोकांच्या वावरामुळे थांब्यांची दुरावस्था झाली आहे. जलद गतीने बस प्रवास होण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बीआरटी मार्ग सुरू केले आहे. पुण्यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी हा एकमेव पुर्ण मार्ग सुरू आहे. तर नगर रस्त्यावरील बीआरटी अर्धवट स्थितीत आहे. पिंपरी चिंचवडमधील मार्गांची ही अवस्था आहे. सध्या सुरू असलेल्या बीआरटी मार्गांची स्थिती फारशी चांगली नाही . या मार्गांवर धावणाऱ्या बसचे उत्पन्न इतर मार्गांवरील बसच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. प्रवाशांकडूनही या मार्गांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण मार्गांच्या देखभाल-दुरूस्तीकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या मार्गांवर धावणाऱ्या बसवर पीएमपीच्या नियंत्रण कक्षातून नियंत्रण ठेवले जात होते. पण इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणाच बंद पडल्याने हे काम ठप्प झाले आहे.स्थानकांवर बसची माहिती देणारी डिजिटल फलक बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसची माहिती मिळत नाही. बसथांब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविले आहेत. पण ही यंत्रणा बंद असल्याने दरवाजे सताड उघडे असतात. बस येण्यापुर्वी प्रवासी या ठिकाणी धोकादायक पध्दतीने बस वाट पाहत असतात. हा दरवाजा रस्त्यापासून काही फूट उंच आहे.  बीआरटी मार्गापासून पुढे मुख्य रस्ता ओलांडताना आजही प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. सुरक्षेच्यादृष्टीने तिथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. थांब्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. थांब्याची स्वच्छताही केली जात नाही. मार्गांमध्ये होणारी इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे बीआरटी बसचा वेगही मंदावला आहे. .......बीआरटी दरवाजाची स्वयंचलित यंत्रणा बंद करून सुरक्षा कर्मचाºयांमार्फत चालवली जाते. हे  कर्मचारी कायम दरवाजे उघडे  ठेवत आहेत. त्यामुळे  प्रवाशांची अडचण होत आहे व सुरक्षिततेचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी करूनही पीएमपी प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पीएमपी व महानगरपालिका प्रशासन एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच जागे होणार का? अशा अकार्यक्षम अधिकाºयांवर कारवाई व्हायला हवी. - संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे