फसवणूक टाळण्यासाठी ब्रोकर आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:42+5:302020-12-04T04:29:42+5:30
.......... लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना कालावधीत स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प झाले होते मात्र भाडेकरू आणि मालक ...

फसवणूक टाळण्यासाठी ब्रोकर आवश्यक
..........
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना कालावधीत स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प झाले होते मात्र भाडेकरू आणि मालक यांच्यातील बहूतांश वाद ब्रोकरनी सोडवले, परिणामी संघर्ष टळला. त्यामुळे ग्राहक खात्रीशीर व्यवहारांसाठी भविष्यातही आम्हालाच प्राधान्य देतील, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ रिअल इस्टेटचे संचालक पराग पासलकर यांनी ʻलोकमतʼ बरोबर बोलतांना केले.
पासलकर म्हणाले, कोरोना काळामध्ये घरांचे व्यवहार करताना किंवा फ्लॅट भाड्याने देताना घेताना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यात ग्राहक, बांधकाम व्यावसायिक, भाडेकरू घरमालक अशा सर्वांचाच संबंध होता. भाडेकरूने, अचानक घर खाली करणे, मालकाने जबरदस्ती करणे, अशा अनेक गोष्टींमुळे भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये वाद झाले होते. अशा वेळेस ब्रोकर यांनी दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करून वाद मिटवले. परिणामी, संघर्षाचे अनेक प्रसंग टळले. कठीण परिस्थितीमध्ये ब्रोकर हा घरमालकांना देवासारखा मदतीला धावून गेला होता.
सध्या अजूनही कोरोनामुळे रिअल इस्टेट मार्केट काही प्रमाणात ठप्प आहे. त्यामुळे ब्रोकरवर मोठे संकट आले आहे. या कठीण प्रसंगात, समाजाने एजंटला योग्यप्रकारे समजून घेतले आणि एजंटमुळे होणारे फायदे लक्षात घेतले तर बाजारातील मरगळ दूर होईल. अर्थचक्र पून्हा चालू होईल. जुनी मालमत्ता विकत घेताना त्या प्रॉपर्टीची संपुर्ण माहिती ही एजंटला असते. नवीन वास्तुप्रकल्पामध्ये फ्लॅट घेत असताना एजंट महत्वाचा का असतो त्याचे कारण बिल्डर कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये आहे त्याचे दर व प्रोजेक्टची पार्श्वभूमी ही माहिती ग्राहकांपेक्षा एजंटला असते. तो प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार आहे व त्याला काही अडचणी आहेत का, याची माहिती सामान्य ग्राहकांपेक्षा इस्टेट एजंट व्यवस्थित देऊ शकतो, असेही पासलकर यांनी सांगितले.