शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लिलाव करणार असाल तरच डाळिंब व्रिकीसाठी आणा : बाजार समितीचा अजब फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 13:06 IST

ऑनलाईन लिलावाच्या तुलनेत पारंपरिक तोंडी लिलाव पद्धतीत भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेस विरोध दर्शविला.

ठळक मुद्देगुलटेकडी मार्केट यार्ड : शेतकरी संतप्तबुधवारपासून डाळिंब यार्डात ई-नाम अंतर्गत ऑनलाइन लिलाव सुरू केंद्रीय पथक सोमवार आणि मंगळवार रोजी पुणे बाजार समितीला भेट देणार

पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डमधील फळ विभागात ई-नाम अंतर्गत डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या सोमवार, मगंळवारी पुणे बाजार समितीला भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तातडीने बुधवारपासून डाळिंब यार्डात ई-नाम अंतर्गत ऑनलाइन लिलाव सुरू केले. परंतु ऑनलाइन लिलावापेक्षा पारंपरिक लिलाव पद्धतीने डाळिंबाला अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या ऑनलाइन लिलाल पद्धतीला शुक्रवारी विरोध केला. यामुळे डाळिंब यार्डात चांगलाच गोंधळ उडाला. यावर बाजार समितीने डाळिंबाचा ऑनलाइन लिलाव करायचा असेल तरच डाळिंब येथे विक्रीसाठी आणा असा अजब फतवा काढला. यामुळे शेतकरी वर्ग चांगला संतप्त झाला आहे. केंद्र शासनाने सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली लागू केली आहे. पुणे बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आणि डाळिंब हा १०० टक्के शेतीमाल हा शेतकऱ्यांचा असल्याने या शेतीमालाचा लिलाव ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार योजनेअंतर्गत (ई-नाम) करण्याच्या सूचना पणनसंचालकांनी यापूर्वीच बाजार समितीला दिल्या होत्या. त्यानुसार पुणे बाजार समितीने डाळिंबासह कांदा, बटाट्याचा समावेश केला असून पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लिलावासाठी डाळिंबाची निवड केली आहे. तर, यापूर्वी बाजार समितीत गुळाचे लिलाव ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. ईनाम योजनेनुसार मागील काही दिवसांत डाळिंब आडत्यांना ऑनलाइन लिलावाबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यावर सुरुवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यावरही बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसण केले होते...........ईनाम अंतर्गत डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवार (दि.९)  आणि मंगळवार (दि.१०) रोजी पुणे बाजार समितीला भेट देणार आहे. यामुळे बुधवार (दि.४) पासून  डाळिंबाच्या ऑनलाइन लिलावाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, ऑनलाईन लिलावाच्या तुलनेत पारंपरिक तोंडी लिलाव पद्धतीत भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेस विरोध दर्शविला.त्यामुळे शुक्रवारी डाळिंब यार्डात गोंधळ निर्माण झाला. त्यावर बाजार समितीने शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेण्याऐवजी डाळिंबाची विक्री ऑनलाइन लिलावाने करायची असल्यास बाजारात डाळिंब आणावे अन्यथा डाळिंब विक्रीसाठी आणू नये, असा फतवा काढला आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. आता केंद्रीय पथकापुढे ऑनलाइन लिलावाचे काय होणार हे पाहणे जरूरीचे आहे. याबाबत समितीचे सचिव बी. जे. देशमुख म्हणाले, बाजार आवारात ईनाम योजनेअंतर्गत डाळिंबाची विक्री अनिवार्य करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डonlineऑनलाइनFarmerशेतकरी