शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाने दिले तिघांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 6:33 PM

अपघातात ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला. या तरुणामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.

पुणे : आजीकडे जात असताना अचानक बुलेट घसरून तो कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा "ब्रेनडेड" झाला. अशा परिस्थितीत त्याचे इतर अवयव हे एखाद्या गरजू रूग्णाचा जीव वाचवू शकतात याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनी देखील आपला तरूण मुलगा गेला आहे याचे दुःख पचवत त्याचे पाच अवयव दान केले. त्यामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.  

विश्रांतवाडी येथील भिमनगर येथे राहणारा मयूर शहाजी मातंग (वय 23)याचा 15 सप्टेंबर रोजी काॅमर्सझोन चौकात बुलेट घसरून अपघात झाला. भिमनगर येथून मेंटल कार्नर येथे आजीच्या घरी जात असताना हा गंभीर अपघात झाला. येरवडा पोलिसांनी अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली. रूग्णालयात दाखल केल्यावर त्याला मेंदूला जबर मार लागल्याने तो ब्रेनडेड झाला होता. मात्र त्याचे इतर अवयव हे गरजू रूग्णांसाठी उपयोगाचे होते. नगररोड येथील  सह्याद्री रूग्णालयाच्या डाॅक्टरांनी त्याच्या पालकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अवयवदानानंतर आपला मुलगा एखाद्याला जीवदान देवू शकतो. हे समजल्यानंतर त्याच्या पालकांच्या संमतीने त्याचे हदय,लिव्हर,स्वादुपिंड व दोन किडण्या असे पाच अवयव दान करण्यात आले. 

विशेष म्हणजे मयूर हा अत्यंत गरीब कुटुबांतील मुलगा.आई,वडील व तीन भावडांसह भिमनगर येथे वास्तव्यास होता. मजूरी करून जीवनाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्व सामान्य कुटुंबाने आपल्या तरूण मुलाचे अवयव दान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. याबाबत सह्याद्री रूग्णालयाचे न्यूरोसर्जन डाॅ. सचिन महाजन म्हणाले, मयूर मांतग हा तरूण अपघातात डोक्याला गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. तपासणीनंतर त्यांच्या मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे तो ब्रेनडेड झाला होता. अशा परिस्थितीत रूग्णाचा मेंदू पूर्णपणे निकामी(मृत) झाला होता. मात्र त्याच्या शरिरातील इतर अवयव हे सुस्थितीत व इतर गरजूंना रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार होते. सह्याद्री रूग्णालयातील डाॅक्टर व समुपदेशकांनी अवयवदानाचे महत्व पटवून दिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या संमतीने त्याचे पाच अवयव दान करण्यात आले. या दुर्दैवी अपघातात मयूर जरी गेला असला तरी "तो" त्याने दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून  जिवंतच राहणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबियांने तरूण मुलाचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूOrgan donationअवयव दानAccidentअपघात