Pune News| धायरीजवळील कॅनाॅलमध्ये पोहताना मुलगा गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:10 IST2022-02-01T13:08:00+5:302022-02-01T13:10:54+5:30
पुणे : धायरी फाट्याजवळील कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला १५ वर्षांचा मुलगा सोमवारी (दि. ३१) दुपारी वाहून गेला. स्थानिक नागरिक व ...

Pune News| धायरीजवळील कॅनाॅलमध्ये पोहताना मुलगा गेला वाहून
पुणे :धायरी फाट्याजवळील कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेलेला १५ वर्षांचा मुलगा सोमवारी (दि. ३१) दुपारी वाहून गेला. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाकडून शोधमोहीम जारी करण्यात आली आहे.दीपक मारुती बळकटे ( वय १५, रा. खेडेकर कॉर्नर, नऱ्हे ) हे या मुलाचे नाव आहे. तो दुपारी एकच्या सुमारास पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये गेला होता. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे तो कॅनॉलमध्ये वाहून गेला.
हा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी तातडीने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलालाही त्याबाबत कळविण्यात आले. या जवानांनीही त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; पण तो सापडू शकला नाही.
दरम्यान, जनता वसाहती जवळील कॅनॉल रस्त्यावरून रिक्षासह कॅनॉलमध्ये पडलेल्या चालकाचा आजही शोध लागू शकला नाही. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो वाहून दूरवर गेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.