शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात बोगदा

By admin | Updated: January 23, 2017 02:50 IST

भामा-आसखेड धरणात नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाचा (कंट्रोल ब्लास्टिंग) वापर करून २१० मीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

पुणे : भामा-आसखेड धरणात नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाचा (कंट्रोल ब्लास्टिंग) वापर करून २१० मीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. पालिका प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत असून, त्यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला तरीही जॅकवेलमधून उपलब्ध पाण्याचा उपसा करणे शक्य होणार आहे. सध्या जॅकवेलचे काम सुरू असून ते पूर्ण झाले, की येत्या काही महिन्यांत धरणातील पाण्यात हे नियंत्रित स्फोट करण्यात येतील.पुण्याच्या पूर्व भागाला म्हणजे विश्रांतवाडी ते संगमवाडी, लोहगाव या परिसराला पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पालिकेने भामा-आसखेड धरणातून ही पाणी योजना प्रस्तावित केली आहे. धरणातील अगदी तळाचा शिल्लक पाणीसाठाही उचलता यावा, यासाठी बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. जॅकवेलपासून धरणाच्या मध्य भागापर्यंत बोगदा असेल. पाण्यापासून सुमारे ३४ मीटर खोलीवर हे काम होईल. पाणी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडून हेही काम करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना आयटीडी ही अशा नियंत्रित स्फोट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी मार्गदर्शन करणार आहे.पालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे व या प्रकल्पाचे काम पाहणारे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले, की धरणातील पाणीसाठा कमी झाला, की जॅकवेलमधून पाण्याचा उपसा करणे अवघड होते. असे होऊ नये, यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. धरणाच्या एका बाजूला असणाऱ्या जॅकवेलची पाण्यातील बाजू धरणाच्या तळाच्याही खाली असेल. या बाजूकडून ते धरणाच्या सर्वाधिक खोलवर बाजूपर्यंत हा बोगदा असेल. त्याचा व्यास साधारण १० फूट इतका असणार आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला, तरी या बोगद्यातून पाणी थेट जॅकवेलपर्यंत येईल व तिथून त्याचा उपसा करता येईल.कंट्रोल ब्लास्टिंग हे आधुनिक तंत्रज्ञान असून भूस्तरात खोलवर असलेले पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. पाण्याखाली स्फोट घडवून आणून त्यातून टनेल तयार करण्याचे काम त्यापेक्षा क्लिष्ट आहे. धरणात ३४ मीटर खोलीवर करण्यात येणारा बोगदा २१० मीटर लांबीचा व १० फूट व्यासाचा असल्याने एकापेक्षा जास्त स्फोट करावे लागणार आहेत. त्याचे आरेखन झाले, की स्फोटांची पूर्वतयारी करण्यात येईल, अशी माहिती गेडाम यांनी दिली.(प्रतिनिधी)