शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 20:10 IST

अजित पवार यांचा १५ तासात तालुक्यातील ५९ गावांमध्ये दाैरा

बारामती- विधानसभा निवडणुक अवघ्या १८ दिवसांवर आली आहे.त्यामुळे एेन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी बारामतीत दोन्ही ‘पवारां’ची धावाधाव सुरु आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मीपुजनाच्या मुहुर्तावर बारामती तालुक्यात १५ तासांत ५९ गावांचा दाैरा केला.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी स`थानिक अडचणी जाणून घेत मतदारांशी संपर्क साधत  त्यांची भुमिका मांडली.

शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार यांचा दाैरा सकाळी ७ वाजताच सुरु झाला.मळद,गुणवडी गावांपासून सुरु झालेला हा दाैरा रात्री १० पर्यंत धुमाळवाडी,येळेवस्ती पर्यंत नियोजित होता.राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख नेते म्हणुन उपमुुख्यमंत्री पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे पवार यांनी बारामतीकरांपर्यंत पोहचण्यासाठी एकाच दिवशी १५ तासांत ५९ गावांमध्ये दाैरा केला.यावेळी पवार यांनी गावकर्यांच्या भेटीगाठी घेतल्या.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून या सरकारमध्ये आपल्याला पुन्हा एकदा महत्वाचे पद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

मागे जे झाले ते गंगेला मिळालं. लोकसभेच्या वेळी जी निवडणुक झाली, जे मतदान झाले, तो तुमचा अधिकार होता. त्याबाबत आता मला काही बोलायचे नाही. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत तुम्ही कोणाचेही भावनिक आवाहन न एकता मला मतदान करुन निवडून द्या. बारामती तालुक्याचा अधिक फायदा करण्यासाठी मला निवडून द्या, आपण यापेक्षा अधिक कामे करु. तुम्हाला खात्रीने सांगतो, यावेळी राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे. आपल्याला चांगले पद मिळणार आहे.

मात्र, कोणीही येइल आणि भावनिक करेल तर तुम्ही भावनिक होवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. दरम्यान,पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी  आज बारामती शहरात पायी चालत मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला.तसेच खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह जय पवार यांनी देखील  उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत.

तसेच गेल्या दोन दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे,महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी शहरातील व्यापारी,नागरीकांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.त्यामुळे एेन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव सुरु असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार