शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

काळेवाडीत आढळला जिवंत बॉम्ब

By admin | Updated: September 10, 2015 04:19 IST

काळेवाडीतील एका अल्पवयीन मुलाला आढळून आलेली वस्तू शेजारी राहणाऱ्या तरुणाने ताब्यात घेतली. विक्री केल्यास मोठी रक्कम मिळू शकेल, अतिस्फोटक स्वरूपातील जिवंत हातबॉम्ब

पिंपरी : काळेवाडीतील एका अल्पवयीन मुलाला आढळून आलेली वस्तू शेजारी राहणाऱ्या तरुणाने ताब्यात घेतली. विक्री केल्यास मोठी रक्कम मिळू शकेल, अतिस्फोटक स्वरूपातील जिवंत हातबॉम्ब चक्क सव्वा महिना घरात ठेवून विक्रीसाठी तो ग्राहकाचा शोध घेत होता. हातबॉम्ब विक्रीसाठी ग्राहकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता विक्की अशोक सावंत (वय २५, रा. काळेवाडी, शिवकृपा कॉलनी) या आरोपीला अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काळेवाडीतील एका अल्पवयीन मुलाला थेरगाव केजूबाई मंदिराजवळ नदीपात्रालगत महिन्यापूर्वी अनोळखी वस्तू आढळली. कुतूहल म्हणून ती वस्तू त्याने घरी नेली. काळेवाडी शिवकृपा कॉलनीत त्याच्या शेजारी राहणाऱ्या विक्की सावंत नावाच्या तरुणाने ही वस्तू पाहिली. अल्पवयीन मुलाकडून त्याने ती वस्तू घेतली. वस्तू पाहिल्यानंतर बॉम्बसारखे काही तरी आहे, हे त्याच्या निदर्शनास आले. शेजारी राहणाऱ्या अन्य कोणाला काही कळू न देता, त्याने ही वस्तू विक्रीचा घाट घातला. ही वस्तू ज्यांना कामी येईल, अशा व्यक्तींचा तो शोध घेत होता. वस्तूची किंमत तीन लाख रुपये त्याने निश्चित केली. जिवंत हातबॉम्ब आहे, हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने कोठेही धक्का न लावता, तोडफोड करण्याचा प्रयत्न केला नाही. अत्यंत स्फोटक अशा स्वरूपातील हातबॉम्ब घेऊन तो ग्राहकाच्या शोधार्थ फिरत राहायचा. रात्री बॉम्ब घरी ठेवत असे. हातबॉम्ब विक्रीसाठी एक तरुण वाकड परिसरात फिरत असल्याचे समजल्यानंतर खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर यांनी या प्रकरणी शोध घेण्यास पोलीस पथक पाठविले. मागावर असलेल्या पोलिसांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संशयावरून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे जिवंत बॉम्ब सापडला. बॉम्बशोधक पथकाला वाकड येथे पाचारण करण्यात आले. बॉम्बशोधक पथकाने तरुणाकडील बॉम्ब ताब्यात घेतला. पाहणी केली असता जिवंत हातबॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून बॉम्ब ताब्यात घेण्यात आला असून, हातबॉम्ब बाळगल्याप्रकरणी तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बॉम्ब तपासणीसाठी खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत पाठविण्यात आला आहे.