येरवड्यात आढळल्या बोगस शिधापत्रिका

By Admin | Updated: April 3, 2015 03:28 IST2015-04-03T03:28:17+5:302015-04-03T03:28:17+5:30

येथील रेशनिंग विभागाच्या ई-परिमंडळ कार्यालयाचे बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून २ बोगस शिधापत्रिका तयार करण्यात

Bogus ration found in Yervada | येरवड्यात आढळल्या बोगस शिधापत्रिका

येरवड्यात आढळल्या बोगस शिधापत्रिका

येरवडा : येथील रेशनिंग विभागाच्या ई-परिमंडळ कार्यालयाचे बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून २ बोगस शिधापत्रिका तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण समोर येताच परिमंडळ कार्यालयाने सखोल चौकशी करण्याची मागणी करणारे निवेदन येरवडा पोलिसांना दिले.
रहिम अब्दुलहकीम शेख (रा. जयजवाननगर, येरवडा) व ज्योती नरेंद्र वाल्मीकी यांना बनावट शिधापत्रिका काढून देण्यात आल्या आहेत. रहिम शेख हे मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची पांढरी शिधापत्रिका (के.एल. ३५५९३५) घेऊन ई परिमंडळ कार्यालयात आले होते. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली.

Web Title: Bogus ration found in Yervada