नीरा नृसिंहपूर येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:57+5:302021-04-19T04:08:57+5:30

या शिबिराचे उद्घाटन----------- शनीभाऊ शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना रोगाचे महाभयंकर संकट निर्माण झाल्यामुळे रक्ताचा ...

Blood donation camp at Nira Nrusinhapur | नीरा नृसिंहपूर येथे रक्तदान शिबिर

नीरा नृसिंहपूर येथे रक्तदान शिबिर

या शिबिराचे उद्घाटन----------- शनीभाऊ शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना रोगाचे महाभयंकर संकट निर्माण झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा होऊ नये त्यानिमित्ताने तुटवड्याला सामोरे जाण्यासाठी एक पाऊल देशासाठी म्हणून अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनीभाऊ शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबिर घेण्यात आले. एकूण रक्तदान ५१ ग्रामस्थांनी केले, तर यांना प्रत्येकी एक टीशर्ट व केळी, चहा, बिस्किटही देण्यात आली.रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी श्रीकांत दंडवते, आण्णासाहेब काळे, उपसरपंच विठ्ठल देशमुख, भय्यासाहेब बंडगर, निलेश कोळी, किशोर जाधव, धनंजय पवार, तात्यासाहेब जाधव, अक्षय गोडसे, विकी निंबाळकर, दीपक जाधव हे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर तालुका अध्यक्ष नीलेश कोळी यांनी केले .

Web Title: Blood donation camp at Nira Nrusinhapur