बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:42 IST2020-06-25T19:39:07+5:302020-06-25T19:42:03+5:30

आगामी काळात राष्ट्रवादी भाजप वाद रंगणार असल्याचे संकेत...

BJP's sloganeering in support of Gopichand Padalkar in Baramati | बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजपची घोषणाबाजी

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीत गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रारीनंतर  आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पडळकर यांच्या समर्थनार्थ बारामती शहरातील भाजप कार्यकर्ते पुढे आले आहेत.भाजपने पडळकर यांच्या समर्थनार्थ  येथील भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे  आगामी काळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे राजकीय वाद रंगणार असल्याचे संकेत आहेत.

आमदार पडळकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या समोर पडळकर यांना समर्थन देत घोषणा दिल्या.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य बरोबर आहे. तुम्ही पंतप्रधान यांच्यावर फेकू ,अशी टीका करता. ते  कसे चालते,असा सवाल केला. शेतकरी,कामगार,धनगर आरक्षण याबाबतीत उदासीनता असल्याची टीका करीत  आमदार पडळकर यांनी आज केलेल्य  वक्तव्याला पाठिंबा दर्शविला.

यावेळी भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे,शहराध्यक्ष सतीश फाळके,सुधाकर पांढरे,  भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————

Web Title: BJP's sloganeering in support of Gopichand Padalkar in Baramati