शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा विश्वासू माणूस अन् इंदापूर दुधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 18:02 IST

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

इंदापूर : इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष मंगेश ( बाबा  ) वामनराव पाटील ( वय ५५ ) यांचे निधन झाले. मंगेश पाटील यांना मंगळवारी हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही तपासणीतुन निष्पन्न झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने गुरुवार ( दि. १५ ) रोजी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. 

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे विश्वासु समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी दोन भाऊ, एक मुलगी, जावई असा परिवार आहे.  पाटील त्यांच्या निधनानंतर इंदापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. तर हजारो नागरिकांनी सोशल मिडियावर शोक व्यक्त केला. 

मंगेश पाटील यांना गुढीपाडवाच्या सणादिवशीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले होते. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील डॉ. एम. के. इनामदार यांच्याकडे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तेथे तपासणीत त्यांना कोरोना असल्याचे दिसून आले. त्यातच त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. 

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगेश पाटील यांनी इंदापूर येथील शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, हर्षवर्धन पाटील सहकारी मोटार वाहतूक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते तसेच इंदापूर लायन्स क्लबचे ते संस्थापक मंडळात होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे तज्ञ संचालक म्हणून त्यांनी काही दिवस काम पाहिले होते. सध्या ते इंदापूर दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून काम पहात होते. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यशस्वी उद्योजक व राजकीय नेता म्हणून नाव कमविले होते. स्वामीराज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब (आबा) पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघ:श्याम ( नाना ) पाटील यांचे ते भाऊ होते.

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या