शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

भाजप नगरसेवकाचं महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन फक्त 'चमकोगिरी'साठीच; राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकरांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 5:33 PM

कोविड उद्रेक झालेला असताना अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास सेवा बजावत आहेत. या कोणत्याही गोष्टींची किंमत भाजपा नगरसेवकांना नाही....

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांसह पोलीस आयुक्तांना दिले निवेदन 

धायरी: कोरोना संकटात सर्व अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास कर्तव्य बजावत आहेत.मात्र याची किंमत भाजपा नगरसेवकांना नसून त्यांचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन हे फक्त चमकोगिरी करण्यासाठी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसमहिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

चाकणकर म्हणाल्या, पुणे महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यासंदर्भात कोणतीही आचारसंहिता आणि नियमावली महापालिकेने तयार केली नसून महिला कर्मचाऱ्यांना कुचंबनेला आणि अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत आहे.वानवडी येथील प्रभाग क्रमांक २५ येथे लसीकरण केंद्र चालू करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी मनपा आरोग्य अधिकारी डाॅ.वैशाली जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केलेले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त संबंधित नगरसेवकावर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिले असून महानगरपालिकेत महिला सुरक्षासंदर्भात नियमावली असावी,त्याचे पालन काटेकोरपणे व्हावे अशी मागणीही यावेळी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

यावेळी विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक सचिन दोडके,महिला शहराध्यक्ष मृणालिणी वाणी,सुहास चाकणकर, प्रफुल्ल चाकणकर उपस्थित होते.

काय आहे प्रकरण ...प्रभागात नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनात मागणी लावून धरली होती. यावेळी आरोग्य विभागातील लसीकरण अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनाही घोगरे यांनी तुम्ही काय काम करता,रात्री फोन केला तर उचलला नाही, दोन दिवस झाले फाईल पाठवून तुम्ही काय झोपा काढता का, असे म्हणत डॉ. जाधव यांच्या अंगावर धावून गेले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, यामध्ये तू तू मैं मैं सुरू झाली. अखेर डॉ. जाधव यांना अन्य सहकारी डॉक्टरांनी तर नगरसेवक घोगरे यांना इतर सदस्यांनी मध्यस्थी करून अडविले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPolice Stationपोलीस ठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या